शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

राज्यातील भाजीपाल्याची निर्यात वाढली दीड हजार टनांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 12:00 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे....

ठळक मुद्देपणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांची माहिती : ५० कोटींची झाली उलाढाल द्राक्ष, डाळिंब, आंबा, संत्रा, कांदा भेंडी, कारले, शेवगा, मिरची यासारख्या भाजीपाल्याची निर्यात

पुणे : राज्यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला आणि फळांची निर्यात दीड हजार टनांनी वाढली असून, देशांतर्गत विक्रीतही एक हजार टनांनी वाढ झाली आहे. त्यातून ४९.४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. राज्यातील फळे व भाजीपाल्यास देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळाच्या मार्फत ४४ सुविधा केंद्र उभारण्यात आली आहे. त्या माध्यमातून द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा, संत्रा, कांदा आणि भेंडी, कारले, शेवगा, तोंडली, मिरची यासारख्या भाजीपाल्याची निर्यात करण्यात आली. निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, सहकारी  संस्था, बाजार समित्या, वैयक्तीक शेतकऱ्यांच्या मार्फत ही सुविधा केंद्र चालविली जातात. काही निर्यात केंद्र पणन मंडळ स्वत: संचालित करते. एप्रिल ते जून २०१८च्या तुलनेत एप्रिल ते जून २०१९ मध्ये तब्बल १५१५.६ टन शेतमालाची अधिक निर्यात झाली आहे. शेतमाल निर्यात अमेरिका, जपान, कॅनडा, जर्मनी, युरोपीयन देश, नेदरलँड, रशिया, थायलंड, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, सिंगापूर, चीन, नेपाळ, इराण आणि दुबई या देशांना शेतमाल निर्यात करण्यात आला. त्यात आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, भाजीपाला, फळे, गुलाब फुले, पशुखाद्य आणि कांद्याचा समावेश आहे. तर, परराज्यात बटाटा, गुलाब फुले, कांदा, केळी, डाळिंब, आंबा, कारले, मिरची, दोडका, भेंडी, पालक, हळद अशा विविध प्रकारच्या शेतमालांची विक्री करण्यात आली आहे. तर, राज्यांतर्गत बाजारपेठेत प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, सांगली, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर बाजारात मोठ्या प्रमाणावर शेतमाल पाठविण्यात येतो. ..........शेतकरी झाले निर्यातदारपणन मंडळामार्फत निर्यातपूरक उपक्रमांमधे वाढ व्हावी व युवकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यावसायाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी ‘हॉर्टीकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स’ डिसेंबर २०१५पासून सुरु करण्यात आला आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी, सहकारी संस्था प्रतिनिधी, नवीन उद्योजक यांना निर्यातविषयक प्रशिक्षण दिले जाते. आजतागायत ४६ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून १ हजार १०३ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यातील १०५ जणांनी प्रत्यक्ष निर्यात सुरू केली आहे. तर, १८० प्रशिक्षणार्थींनी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांच्या माध्यमातून कृषी उत्पादनाच्या पुरवठा साखळीची जबाबदारी पार पाडत आहेत. ........निर्यात आकडाअशी झाली उलाढाल    एप्रिल-जून २०१८    एप्रिल-जून २०१९देशांतर्गत विक्री (टन)    ५३४.५८    १५४८.४०देशांतर्गत विक्री लाखांत    १५२.५३    ४६३.७५निर्यात (टन)    २२५२.८    ३७६८.४निर्यात मूल्य लाखांत    ३५७५.४५    ४४८३.७६

टॅग्स :Puneपुणेvegetableभाज्याfruitsफळेFarmerशेतकरी