शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:09+5:302015-02-18T23:54:09+5:30

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा (रू़) ता़ हदगाव येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले़

Various programs for the festival of Shiv Jayanti | शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

वघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे धानोरा (रू़) ता़ हदगाव येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त २० फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले़
दुपारी ३ ते ५ झाकी स्पर्धा, लेझीम स्पर्धा व भव्य मिरवणूक, सायंकाळी ६ वाजता अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर चमत्कारासह सम्राट हटकर व प्रा़डॉ़लक्ष्मण शिंदे करणार असून रात्री लोककलावंतांचा लोकप्रबोधनाचा पोवाडा, विनोदी एकांकिका सादर होणार आहे़ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एकनाथराव पावडे, उद्घाटक शिवाजीराव नरवाडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्राग़णेश शिंदे, सोपानराव क्षीरसागर हे राहणार आहेत़ प्रमुख पाहुणे म्हणून श्यामसुंदर शिंदे, पंडित पवळे, ॲड़दिगांबर देशमुख, धनंजय सूर्यवंशी, संकेत पाटील, भागवत देवसरकर, सतीश देशमुख, एऩजी़ कल्याणकर, मंगलताई मुधोळकर, विठ्ठल शिंदे, जयदीप जाधव, अमोल कदम आदी उपस्थित राहणार आहेत़ उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ धानोरा (रु़) च्या वतीने करण्यात आले आहे़

Web Title: Various programs for the festival of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.