शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
5
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
6
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
7
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
8
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
9
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
10
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
11
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
12
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
13
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
14
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
15
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
16
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
17
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
18
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
19
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
20
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा

ज्ञानवापी: शुक्रवारच्या नमाजपूर्वी मशीद कमिटीचं आवाहन, वुझुखान्यासंदर्भात केलं असं भाष्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:09 PM

ज्ञानवापी प्रकरणामुळे वझुखाना सील करण्यात आला आहे. यामुळे आज शुक्रवारच्या नमाज पठनासाठी मशिदीत मोठ्या संख्येने येऊ नये, असे आवाहन अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. 

ज्ञानवापी मशिदीसंदर्भात (Gyanvapi Mosque) आज  (शुक्रवारी) दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान, अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने (Anjuman Intizamia Masjid Committee) लोकांनी मशिदीत अधिक गर्दी करू नये असे म्हटले आहे. कारण वुझुखाना सील करण्यात आला आहे. आज शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या संख्येने लोक मशिदीत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

मोठ्या संख्येने मशिदीत न येण्याचं आवाहन - ज्ञानवापी प्रकरणामुळे वझुखाना सील करण्यात आला आहे. यामुळे आज शुक्रवारच्या नमाज पठनासाठी मशिदीत मोठ्या संख्येने येऊ नये, असे आवाहन अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. 

अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीनं जारी केलं पत्र - यासंदर्भात अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीने एक पत्र जारी केले आहे. यात, "सर्वांनाच माहीत आहे, की शाही जामा मशीद ज्ञानवापी वाराणसीचे प्रकरण सध्या वाराणसी न्यायालयाशिवाय, सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर, जामा मशिदीचा वझुखाना आणि शौचालय सील करण्यात आले आहे. या प्रकरणी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अल्लाहच्या कृपेने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा," असे म्हणण्यात आले आहे. 

अपापल्या परिसरातच करावे शुक्रवारचे नमाज पठण -याशिवाय, "वुझुखाना आणि शौचालय सील करण्यात आल्याने, वुझू आणि शौचालयाची समस्या निर्माण झाली आहे. तसेच, शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. यामुळे ही समस्या अधिक वाढेल. यामुळे, लोकांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी मोठ्या प्रमाणावर येणे टाळावे आणि नेहमी प्रमाणेच आजही आपापल्या परिसरात नमाज पठण करावे. तसेच, जे लोक नमाज पठणासाठी येणार असतील त्यांनी शौचालय आणि वुझू करून यावे, असेही अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीच्या पत्रात म्हणण्यात आले आहे. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदNamajनमाजMuslimमुस्लीमVaranasiवाराणसी