संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 12:08 IST2020-07-04T11:56:04+5:302020-07-04T12:08:47+5:30
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या कुटुंबापासून दूर राहून, जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करत आहेत.

संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण
वाराणसी - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 648315 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 18655 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. देशात काही ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीसही आपल्या कुटुंबापासून दूर राहून, जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र काम करत आहेत. मात्र याच दरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र मास्क लावायला सांगितल्यामुळे पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मास्क न लावल्यामुळे टोकलं म्हणून भाजपाच्या एका नेत्याने पोलिसांना मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मास्क न लावण्यावरून वाद झाला आणि पुढे नेत्याने आणि काही लोकांनी पोलिसांना मारहाण करायला सुरुवात केली. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मास्क न घालता फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी रोखलं. त्याने फोन करून भाजपाच्या काही मंडळींना बोलावलं. भाजप जिल्हा पंचायत सदस्य सुरेंद्र पटेल आणि त्यांचा भाऊ बिंदू पटेल यांच्यासह इतर काही लोक आली. त्यांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी भाजपा नेत्यासह अनेकांवर कारवाई केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मास्क लावायला सांगितला अन्... सरकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार, Video व्हायरलhttps://t.co/0ve8khc246#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#mask
— Lokmat (@MiLOKMAT) July 1, 2020
काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशच्या नेल्लोरमध्ये ही अशीच एक घटना घडली होती. सरकारी कार्यालयात एक कर्मचारी मास्क घालून आला नाही म्हणून त्याच्यासोबतच काम करणाऱ्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्याने त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यावरून दोघांमध्ये थोडा वाद झाला. संतापाच्या भरात कर्मचाऱ्याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेला वाचवण्यासाठी इतरही काही कर्मचारी आले मात्र त्या व्यक्तीने बेदम मारहाण सुरूच ठेवली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा
देशातील 'या' राज्यात कुत्र्याच्या मांसची विक्री, सरकारने घातली बंदी
CoronaVirus News : बघूया सर्वात आधी कोणाला होतोय कोरोना; लागण होण्यासाठी रुग्णासोबत पार्टीचं आयोजन
CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका
घरी राहा, सुरक्षित राहा! येत्या 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी