उत्तरकाशीमध्ये दरीत व्हॅन कोसळली; 13 भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 22:08 IST2018-09-03T18:22:59+5:302018-09-03T22:08:41+5:30

Varan collapses in Uttarkashi; 9 dead deaths | उत्तरकाशीमध्ये दरीत व्हॅन कोसळली; 13 भाविकांचा मृत्यू

उत्तरकाशीमध्ये दरीत व्हॅन कोसळली; 13 भाविकांचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये आज भाविकांची व्हॅन 100 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 13 भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गंगोत्री हायवेवर घडली. 




सोमवारी 15 भाविकांना घेऊन जाणारी व्हॅन गंगोत्रीहून परतत होती. यावेळी भूस्खलन झाल्याने व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व व्हॅन भागिरथी नदीजवळच्या दरीमध्ये कोसळली. यामध्ये 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी असल्याचे जिल्हा आपत्कालीन विभागाचे अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले. 

Web Title: Varan collapses in Uttarkashi; 9 dead deaths