शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:09 IST

Vaishno Devi Landslide: सुरक्षिततेच्या दृष्टीने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

Vaishno Devi Landslide: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज(दि.२६) माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलनाची घटना घडली आहे. अर्धकुंवारीजवळ घडलेल्या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कटरा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरू करण्यात आले. मार्गावरील इतर भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. 

भूस्खलनाचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ट्रॅकवर मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्याचे दिसत आहे. बचाव पथक दोरी आणि बॅरिकेडिंगच्या मदतीने भाविकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. अर्धकुंभरी ते भवन मार्ग बंद करण्यात आला आहे. पावसामुळे जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद झाली आहे.

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

शाळांना सुट्टी जाहीर, परीक्षा पुढे ढकललीखराब हवामानामुळे विविध सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा २७ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जम्मू आणि काश्मीर शालेय शिक्षण मंडळाने बुधवारी होणाऱ्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची घोषणा केली आहे. 

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंदडोडा येथे ढगफुटीमुळे १० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. रामबन जिल्ह्यातील चंदरकोट, केला मोर आणि बॅटरी चष्मा येथे टेकड्यांवरून दगड पडल्यानंतर आज सकाळी २५० किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून थांबवण्यात आली. जम्मूमधील उधमपूर आणि काश्मीरमधील काझीगुंड येथील बारमाही महामार्गावरील वाहनांची वाहतूकही थांबवण्यात आली आहे. 

२७ ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशाराहवामान अंदाजानुसार २७ ऑगस्टपर्यंत जम्मू, सांबा, कठुआ, रियासी, उधमपूर, राजौरी, रामबन, डोडा आणि किश्तवार जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उंच भागात ढगफुटी, पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील पाच तास जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरRainपाऊसfloodपूरriverनदीDeathमृत्यू