शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

व्ही. के. सिंह यांनी केली छळवणूक

By admin | Updated: August 19, 2016 01:05 IST

लष्करातील तत्कालीन जनरल व्ही. के. सिंह यांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास दिला, बढती रोखली, आपल्यावर बेकायदा प्रतिबंध आणले, असे गंभीर आरोप लष्कर प्रमुख दलबीर सिंह

नवी दिल्ली : लष्करातील तत्कालीन जनरल व्ही. के. सिंह यांनी आपल्याला अनेक प्रकारे त्रास दिला, बढती रोखली, आपल्यावर बेकायदा प्रतिबंध आणले, असे गंभीर आरोप लष्कर प्रमुख दलबीर सिंह यांनी केले आहेत. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दिले आहे. सध्या केंद्रात मंत्री असलेले व तत्कालिन जनरल व्ही.के. सिंह यांनी खोटे, निराधार आणि काल्पनिक आरोप करत आपल्याला त्रास दिल्याचे दलबीर सिंह यांनी या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपणाला १९ मे २०१२ रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आणि आपल्यावर प्रतिबंध आणण्यात आले. आसाममधील जोरहाट येथील २०११ च्या एका आॅपरेशनमध्ये असफल झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. आर्मी कमांडरच्या पदोन्नतीतही आपल्याबाबत पक्षपाती धोरण अवलंबण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले आहे.व्ही. के. सिंह ३१ मे २०१२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर जनरल विक्रम सिंह यांची नियुक्ती झाली व जूनमध्येच आपल्यावरील हे प्रतिबंध हटविण्यात आले. त्यानंतर आपली पूर्व भागात कमांडरपदी नियुक्ती झाली, असेही दलबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. व्ही. के. सिंह हे यापूर्वीही निवृत्तीच्या तारखेवरुन चर्चेत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)