Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:13 IST2026-01-02T16:11:53+5:302026-01-02T16:13:05+5:30
Girdhari Lal Sahu Viral Video: कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Viral Video: "बिहारमध्ये २०-२५ हजारांत मुली मिळतात", कॅबिनेट मंत्र्यांच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
उत्तराखंडमधील भाजप सरकार आधीच अंकिता भंडारी हत्याकांडाच्या प्रकरणावरून विरोधकांच्या निशाण्यावर असताना, आता एका नव्या वादामुळे सरकारची अडचण वाढली आहे. कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गिरधारी लाल साहू असे म्हणताना ऐकू येत आहेत की, "जर लग्न होत नसेल, तर २०,०००- २५,००० रुपयांना बिहारमधून मुलगी विकत घ्या. माझ्यासोबत चला, मी मिळवून देतो" एका जबाबदार मंत्र्याच्या पतीने महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उत्तराखंडच्या राजकारणात मोठी ठिगणी पडली आहे.
"लड़की बिहार से ले आएंगे! बिहार में ₹20-25 हजार में ही मिल जाती है!"
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) January 2, 2026
भाजपाइयों और संघियों की बिहार की महिलाओं के बारे में ऐसी घृणित सोच है!
इस पर प्रधानमंत्री और गृहमंत्री का भाजपा की ओर से स्पष्टीकरण आना चाहिए!
पर बिहार भाजपा, जेडीयू और समस्त BJP के नेताओं के मुंह पर अब ताला… pic.twitter.com/a78WPZSg42
या विधानानंतर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने भाजपवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुजाता पाल यांनी हे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, "महिला सक्षमीकरण मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्याच्या घरातूनच जर अशी भाषा येत असेल, तर हे सरकार महिलांचा सन्मान कसा करणार? ही भाजपची खरी मानसिकता आहे." शिवाय, बिहारमधील महिलांचा अपमान केल्याबद्दल आरजेडीने एक्सवर पोस्ट करत भाजप आणि आरएसएसवर टीका केली. "भाजप नेत्यांच्या मनात बिहारी महिलांबद्दल किती घृणास्पद विचार आहेत, हे यातून स्पष्ट होते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे," अशी मागणी आरजेडीने केली आहे.
साहू यांचे स्पष्टीकरण
वाढता वाद पाहून गिरधारी लाल साहू यांनी एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले. त्यांनी दावा केला की, "माझ्या विधानाचा विपर्यास केला जात आहे. मी केवळ एका मित्राच्या लग्नाबाबतची जुनी घटना सांगत होतो. माझी पत्नी रेखा आर्य यांची प्रतिमा मलिन करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि ते जाणीवपूर्वक राजकारण करत आहे."