काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 10:36 IST2025-11-23T10:35:46+5:302025-11-23T10:36:43+5:30
नैनीतालमधील कैंची धामजवळ भीषण अपघात झाला. अल्मोडाहून हल्द्वानीला लग्नासाठी जाणाऱ्या लोकांची कार खोल दरीत पडली.

काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
नैनीतालमधील कैंची धामजवळ भीषण अपघात झाला. अल्मोडाहून हल्द्वानीला लग्नासाठी जाणाऱ्या लोकांची कार ६० मीटर खोल दरीत पडली. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
शनिवारी रात्री खैरना पोलीस चौकीला कैंची धामजवळ एक एसयूव्ही दरीत पडल्याची माहिती मिळाली. कारमध्ये चार जण होते.एसडीआरएफ चौकी खैरना येथील निरीक्षक राजेश जोशी यांच्या नेतृत्वाखालील एक पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. रतीघाट नावाच्या ठिकाणी गाडी खोल दरीत पडल्याचं आढळून आलं. ही गाडी अल्मोडाहून हल्द्वानीला जात होती.
नैनीताल के रातीघाट के पास देर शाम शादी समारोह में शामिल होने जा रहे चार शिक्षक दुर्घटना का शिकार हो गए। अल्मोड़ा से हल्द्वानी की ओर जा रही एसयूवी अचानक अनियंत्रित होकर शिप्रा नदी में जा गिरी।
\— bhUpi Panwar (@askbhupi) November 23, 2025
हादसे में सुरेंद्र भंडारी और पुष्कर भौसोड़ा़ की मौके पर ही मौत हो गई। जहां उपचार के… pic.twitter.com/10ff8Uf9Eo
एसडीआरएफ पथकाला घटनास्थळी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागला. दरी खूपच खोल होती, डोंगराळ प्रदेश खडबडीत होता आणि रात्रीच्या दाट अंधारामुळे बचावकार्य आणखी कठीण झाले. तरीही वेळ वाया न घालवता ऑपरेशन सुरू केलं. पथकाला गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी दोरी आणि स्ट्रेचरचा वापर करावा लागला.
बचाव पथकाला दरीत एक जखमी व्यक्ती आढळली, ज्याला १०८ रुग्णवाहिकेने सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. मनोज कुमार असं जखमी व्यक्तीं नाव आहे, जो अल्मोडा येथील रहिवासी आहे. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एसडीआरएफ पथकाने खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.