शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Uttarakhand Disaster : उत्तराखंडमधील चमोलीत धरण फुटल्याने हाहाकार, पंतप्रधान मोदी, शाह यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 3:56 PM

पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. (Uttarakhand Disaster updates)

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आहे. नदीचे पाणी वेगाने पुढे सरकत आहे. जवळपासच्या भागातही पाणी पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही भागातून लोकांना बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. येथील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प वाहून गेला असून या प्रकल्पासाठी काम करत असलेले 100 ते 150 कामगार बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Nanda devi glacier break in chamoli joshimath rescue ops underway)

आयटीबीपी, NDRF आणि SDRG च्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वारला अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत घटना स्थळी रवाना झाले आहेत.

सर्वतोपरी मदत करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन -यासंदर्भात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शी फोनवरून संपर्क साधला असून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच शक्य ती सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

NDRF च्या आणखी टीम रवाना-शाहकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे, की "उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीसंदर्भात माहिती मिळताच, मी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावतजी, DG ITBP व DG NDRF यांच्याशी चर्चा केली. संबंधित सर्व अधिकारी लोकांच्या संरक्षणासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. NDRF च्या काही टीम बचाव कार्यासाठी गेल्या असून काही टीम दिल्लीहून Airlift करून उत्तराखंडला पाठविण्यात येत आहेत. तेथीस परिस्थितीवर आणचे सातत्याने लक्ष आहे. देवभूमीला शक्य ती सर्व प्रकारची मदत केली जाईल.

पीडितांना सरकारने तत्काळ मदत पुरवावी - राहुल गांधीयासंदर्भात बोलताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे, की चमोली येथे हिमकडा कोसळल्याने निर्माण झालेली पूरजन्य परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. माझ्या संवेदना उत्तराखंडमधील जनतेसोबत आहेत. राज्य सरकारने पीडितांना तत्काळ मदत पुरवावी. तसेच काँग्रेसच्या सहकाऱ्यांनीही बचाव कार्यात मदत करावी.

 

टॅग्स :foodअन्नDamधरणuttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडा