अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:51 IST2025-04-20T12:48:47+5:302025-04-20T12:51:02+5:30

Ward Boy Stealing Jewellery From Deceased Woman: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित वॉर्ड बॉयविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Uttar Pradesh Ward Boy Caught On Camera Stealing Jewellery From Deceased Woman At Shamli Hospital | अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशातील शामली येथील एका रुग्णालयात संतापजनक प्रकार घडला. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगारवरील सोन्याचे दागिने चोरताना वॉर्ड बॉय सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित वॉर्ड बॉयविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबरी परिसरातील हिरणवाडा गावातील सचिन कुमार यांची पत्नी २६ वर्षीय श्वेता हिचा शनिवारी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. तिचा मृतदेह तपासणीसाठी जिल्हा संयुक्त रुग्णालयात नेण्यात आला.बाबरी पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस अधिकारी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी आल्या, तेव्हा त्यांना महिलेच्या सोन्याच्या कानातले गायब असल्याचे आढळले. कुटुंबातील सदस्यांनी सुरुवातीला पोलिसांवर दागिने चोरीचा आरोप केला.

चौकशीत धक्कादायक प्रकार उघड
तपासादरम्यान, वॉर्ड बॉयने एक कानातले पोलिसांना दिले आणि दावा केला की त्याला ते जमिनीवर सापडले. त्याच्या कथेवर संशय आल्याने कुटुंब आणि पोलिसांनी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर आहुजा यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉर्ड बॉय मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढताना स्पष्ट दिसला. यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले असता तो रुग्णालयातून पळून गेला. 

वॉर्ड बॉयविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, सचिन कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी आदर्श मंडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Uttar Pradesh Ward Boy Caught On Camera Stealing Jewellery From Deceased Woman At Shamli Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.