शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

एन्काऊंटरवेळी तोंडातून बंदुकीचा आवाज काढणाऱ्या पोलिसाला मिळणार शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:47 AM

एन्काऊंटरवेळी बंदूक जाम झाल्यावर तोंडात काढला होता फायरिंगचा आवाज

मेरठ: एन्काऊंटरवेळी बंदूक पडल्यावर तोंडानं फायरिंगचा आवाज काढणाऱ्या उत्तर प्रदेश पोलीस दलातील उपनिरीक्षकाची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला होता. गुन्हेगाराला इशारा देण्यासाठी तोंडातून 'ठाय ठाय' आवाज काढणाऱ्या उपनिरीक्षकांना आता पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. एन्काऊंटरवेळी उपनिरीक्षक मनोज यांनी बंदूक बंद पडताच प्रसंगावधान राखल्याचं उत्तर प्रदेशपोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस शौर्य पुरस्कारासाठी केलं जाणार आहे. त्यासाठी त्यांचं नाव डीजीपींकडे पाठवलं जाईल. उपनिरीक्षक मनोज कुमार यांच्या सहकाऱ्यांनीदेखील त्यांच्या साहसाचं कौतुक केलं आहे. 'माझे सहकारी उपनिरीक्षक यांनी एका हिरोसारखं काम केलं. पोलीस दल याकडे सकारात्मकपणे पाहतं. उपनिरीक्षकांचं बंदूक जाम झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी तोंडातून ठाय-ठाय असा आवाज काढला,' असं पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितलं. 13 ऑक्टोबरला संभलमध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. त्यावेळी एका शेतात लपून बसलेल्या गुंडांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी, अचानक पोलीस अधिकाऱ्याजवळ असलेली बंदूक बिघडली. ही बंदूक जाम झाल्यानं त्यातून गोळी फायर होत नव्हती. त्यामुळे या बंद पडलेल्या बंदुकीचा आधार घेत पोलीस उपनिरीक्षक मनोज कुमार यांनी तोंडातून फायरिंगचा आवाज काढत गुंडांचा पाठलाग केला. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पोलीस आणि गुंडांच्या या चमकीवेळी पोलिसांच्या दुसऱ्या पथकानं एका गुंडांच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडलं. मात्र, अचानक बंदूक बंद पडल्यानंतर मनोज कुमार यांनी दाखवलेल्या हुशारीची सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस