Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: Tough fight between BJP and Mahagathbandhan In Uttar Pradesh | Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर 

Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: उत्तर प्रदेशात भाजपा आणि महाआघाडीमध्ये कांटे की टक्कर 

लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, संपूर्ण देशभराचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशमधील मतदारांचा कौलही आता स्पष्ट होऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि महाआघाडी यांच्यात कांटे की टक्कर सुरू आहे. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपा 54 तर महाआघाडी 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.  

उत्तर प्रदेशातील भाजपाचे बहुतांश दिग्गज नेते आघाडीवर आहेत. मात्र  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर पडले आहेत. मात्र अखिलेश यादव आझमगड आणि मुलायमसिंह यादव आघाडीवर आहेत. 

दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भाजपाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली आहे. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  

उत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश नेमका कुणाला साथ देतोय हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र येथे महाआघाडीने भाजपाला मात दिल्यास लोकसभेत बहुमत मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सुरुंग लागू शकतो. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2019: Tough fight between BJP and Mahagathbandhan In Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.