Uttar Pradesh: हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; तक्रारीनंतर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 11:24 IST2022-06-09T11:12:36+5:302022-06-09T11:24:56+5:30

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये ही घटना घडली असून, गावची महिला सरपंच आणि तिच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

Uttar Pradesh: Insult of Hindu faith, photos of gods placed in toilets; Two arrests | Uttar Pradesh: हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; तक्रारीनंतर दोघांना अटक

Uttar Pradesh: हिंदू आस्थेचा अपमान, शौच्छालयात लावल्या देवांचे फोटो असलेल्या टाइल्स; तक्रारीनंतर दोघांना अटक


Uttar Pradesh: गेल्या काही दिवसांपासून देशात विविध ठिकाणी धर्माच्या नावावर हिंसाचार होत आहे. काही जणांकडून धर्मावर आणि लोकांच्या आस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये घडली आहे. हिंदूंच्या आस्थेचा अतिशय घाणेरड्या पद्धतीने अपमान करण्यात आला आहे.

टॉयलेटमध्ये देवांचे फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर ग्राम पंचायतीने बांधलेल्या सार्वजनिक शौच्छालयात देवी-देवांचे फोटो असलेल्या टाइल्स लावण्यात आल्या. हा प्रकार पाहून ग्रामस्थ प्रचंड संतापले आणि पोलिसांकडे तक्रार केली. याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. अखेर ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन जणांना आरोपी ठरवत दोघांना ताब्यात घेतले.

गावचा सरपंच अटकेत
पोलिसांनी ज्या तिघांना आरोपी बनवले आहे, त्यात गावाची महिला सरपंच रेश्मा, तिचा मुलगा मोलहे आणि रहमुल्लाह नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याबद्दल विविध कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महिला सरपंचाने या आरोपांचे खंडन केले आहे.

Web Title: Uttar Pradesh: Insult of Hindu faith, photos of gods placed in toilets; Two arrests