MBBS च्या 21 पदव्या अन् डी फार्माचे 9 सर्टिफिकेट; 'झोलाछाप' डॉक्टर ताब्यात..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 20:26 IST2025-03-09T20:25:22+5:302025-03-09T20:26:22+5:30

पंजाब, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक...विविध राज्यातून बनावट पदव्या मिळवल्या अन् सरकारी रुग्णालयात नोकरीला लागला.

uttar-pradesh-gorakhpur-fake-doctor-degrees-seized-india-medical-fraud-arrest | MBBS च्या 21 पदव्या अन् डी फार्माचे 9 सर्टिफिकेट; 'झोलाछाप' डॉक्टर ताब्यात..!

MBBS च्या 21 पदव्या अन् डी फार्माचे 9 सर्टिफिकेट; 'झोलाछाप' डॉक्टर ताब्यात..!

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रांमध्ये मोठी अनियमितता आढळली आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती डॉक्टर नसून, त्याच्याकडे एमबीबीएसच्या 21 आणि डी फार्माच्या 9 बनावट पदव्या मिळाल्या आहेत. एवढेच नाही तर युनानी, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर म्हणूनही अनेक पदव्या मिळवल्या आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गोरखपूर येथील खोराबार पीएचसीमध्ये कंत्राटी पदावर कार्यरत डॉ. राजेंद्र कुमार याच्याकडे एमबीबीएसची बनावट पदवी असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या माहितीवरून आरोपी डॉक्टर आणि त्याच्या साथीदाराची खलीलाबाद कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी डॉ. राजेंद्र आणि त्याचा साथीदार सुशील चौधरी यांना 24 फेब्रुवारीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 21 एमबीबीएस आणि 9 डी फार्मा पदव्या जप्त केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट डॉक्टराकडून जप्त करण्यात आलेल्या दोन डिग्री लखनऊ आणि शिकोहाबाद येथील विद्यापीठातील आहेत. या दोन विद्यापीठांच्या 4 पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या पथकाने या विद्यापीठांमध्ये जाऊन त्यांची चौकशी केली असता चारही पदव्या बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या खुलाशानंतर पोलिसांनी या दोघांकडून जप्त केलेल्या उर्वरित 17 डिग्रींचा तपास सुरू केला आहे. या पदव्या पंजाब, छत्तीसगड, लखनौ, मेरठ, मुरादाबाद, कर्नाटक, शिकोहाबाद, राजस्थान येथील विद्यापीठांच्या आहेत. या सर्व विद्यापीठांमध्ये तपासासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.

युनानी आणि आयुर्वेदातही पदवी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याशिवाय आरोपींकडून ओपीजेएस युनिव्हर्सिटी चुरू राजस्थानच्या दोन बनावट डिग्री, जेएस युनिव्हर्सिटी शिकोहाबादच्या चार डिग्री, आयएफटीएम युनिव्हर्सिटी मुरादाबादच्या तीन डिग्री, आयुष आणि छत्तीसगडच्या हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीची एक डिग्री आणि राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा पदवीधरची एक बनावट पदवी जप्त करण्यात आली आहे. तसेच डॉ. राजेंद्र कुमार यांच्या साथीदाराकडून मेरठ येथील चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या आयुर्वेदिक आणि युनानी-तिबेटीयन वैद्यकीय प्रणाली मंडळाची बनावट पदवी सापडली आहे.

Web Title: uttar-pradesh-gorakhpur-fake-doctor-degrees-seized-india-medical-fraud-arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.