वडिलांनी दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:15 IST2019-01-02T15:56:14+5:302019-01-02T16:15:18+5:30

वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणानं आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

Uttar Pradesh : Father did not gave money for alcohol, so child committed suicide | वडिलांनी दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं केली आत्महत्या

वडिलांनी दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं केली आत्महत्या

ठळक मुद्देवडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं मुलानं केली आत्महत्याअनिल गळफास घेऊन संपवलं आयुष्ययापूर्वीही दोन वेळा अनिलनं केला होता आत्महत्येचा प्रयत्न

गाझियाबाद - वडिलांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका तरुणानं आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ही कथित घटना उत्तर प्रदेश येथील गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या परिसरातील आहे. पोलीस अधिकारी राजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनपाल यांनी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून त्यांचा मुलगा अनिलनं गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर कुटुंबीयांना त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

(प्रेमप्रकरणाच्या संशयातून वडिलांनी मुलीला पेटवले, विरारमधील घटना)

शर्मा यांनी पुढे असंही सांगितले की, अनिल दारूच्या आहारी गेला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दारू पिण्यासाठीच त्यानं वडिलांकडे पाच हजार रुपये मागितले होते. पण पैसे देण्यास वडिलांनी नकार दिला, म्हणून त्यानं आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. 

(ठाण्यात अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून: पत्नीसह तिच्या मित्राला अटक)

दरम्यान, नातेवाईकांच्या केवळ आग्रहास्तव पोलिसांनी अनिलच्या मृतदहाचे शवविच्छेदन न करता शव त्यांच्या ताब्यात दिले. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीही दोन वेळा अनिलनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  
 
 

Web Title: Uttar Pradesh : Father did not gave money for alcohol, so child committed suicide