उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : गोरखपूर-फुलपूरमध्ये मतदानाला सुरूवात, आदित्यनाथांनी केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 08:30 AM2018-03-11T08:30:03+5:302018-03-11T08:30:03+5:30

गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे.

Uttar Pradesh by-election: Adityanath started voting in Gorakhpur-Fulpur polling | उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : गोरखपूर-फुलपूरमध्ये मतदानाला सुरूवात, आदित्यनाथांनी केलं मतदान

उत्तर प्रदेश पोटनिवडणूक : गोरखपूर-फुलपूरमध्ये मतदानाला सुरूवात, आदित्यनाथांनी केलं मतदान

Next

लखनऊ:  उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अररिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही जागांवर भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विकास आणि गुड गव्हर्नन्ससाठी भाजपाची गरज आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे मतदान केल्यानंतर म्हटले. त्यापूर्वी सकाळी 5 वाजता ते गोरखनाथ मंदिरात पोहोचले होते. गोरखपूर आणि फुलपूर या दोन्ही ठिकाणच्या जागा भाजपासाठी महत्त्वाच्या आहेत. मात्र त्यातही गोरखपूरची निवडणूक भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.या निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निमलष्करी दलाचे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. गोरखपूरमध्ये १०, तर फुलपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १४ रोजी होणार आहे. 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने गोरखपूर येथील जागा रिकामी झाली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली आहे. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उपेंद्र दत्त शुक्ला आणि फुलपूर मधून कौशलेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून, काँग्रेस स्वबळावर लढत आहे.

Web Title: Uttar Pradesh by-election: Adityanath started voting in Gorakhpur-Fulpur polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.