शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

"माझ्यासोबत राहा किंवा प्रियकरासोबत..’’ पतीने ठेवले दोन पर्याय, पत्नीने फोन करून प्रियकराला बोलावलं, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 10:17 IST

Uttar Pradesh Crime News: मर्जीविरुद्ध लग्न झाल्यानंतर एका महिलेच्या तिच्या जुन्या प्रियकरासोबत भेटीगाठी सुरूच राहिल्या. त्यानंतर सदर महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरासोबत अन्य एका तरुणाची हत्या केली.

पती-पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांवरील विश्वास खूप महत्त्वाचा असतो. दोघांपैकी एकाने जरी आपल्या जोडीदाराची फसवणूक केली, दोघांच्या नात्यामध्ये कुणी तिसरा आला तर नातं तुटायला वेळ लागत नाही. कधीकधी अशा प्रकरणामधून काही गंभीर गुन्हेही घडतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथे मर्जीविरुद्ध लग्न झाल्यानंतर एका महिलेच्या तिच्या जुन्या प्रियकरासोबत भेटीगाठी सुरूच राहिल्या. त्यानंतर सदर महिलेच्या पतीने तिच्या प्रियकरासोबत अन्य एका तरुणाची हत्या केली.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार लखनौमधील काकोरी येथे २१ मार्च रोजी रात्री दोन तरुणांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मोहान रोडजवळ त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर  खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान, आता या हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  या प्रकरणी पोलीस शिपाई महेंद्र कुमार आणि त्याची पत्नी दीपिका यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवरही मनोज आणि रोहित नावाच्या दोन तरुणांच्या हत्येचा आरोप असून, दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेचा आरोपी महेंद्र याने पत्नी दीपिला हिला फोन करायला लावून मनोज याला बोलावून घेतले होते.

या प्रकरणातील आरोपी असलेल्या महेंद्र कुमार याचा २०१८ मध्ये दीपिका हियच्यासोबत विवाह झाला होता. त्यावेळी दीपिका हिचं मनोज नावाच्या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. महेंद्रसोबत लग्न झाल्यानंतरही दीपिका हिचं मनोजसोबत असलेलं प्रेमप्रकरण सुरू राहिलं. जेव्हा महेंद्र याला मनोज आणि दीपिका यांच्यामधील नात्याबाबत समजलं तेव्हा तो संतप्त झाला. तसेच त्याने एक तर माझ्यासोबत राहा किंवा प्रियकरासोबत निघून जा, असे दोन पर्याय ठेवले.  तेव्हा पत्नी दीपिका हिने पती महेंद्र याला सोडण्यास नकार दिला. त्यानंतर महेंद्रने तिला तिच्या प्रियकरास बोलावून घेण्यास सांगितले. त्यानुसान तिने मनोज याला फोन करून बोलावून घेतले.

दीपिकाचा फोन आल्यानंतर मनोज हा तिला भेटण्यासाठी एका मित्रासोबत आला. तेव्हा तिथे आधीच दबा धरून बसलेल्या महेंद्र याने मनोज आणि त्याच्या मित्रावर धारदार हत्याराने सपासप वार केले. त्यात या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी महेंद्र घटनास्थळावरून फरार झाला.  या घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण आहे. तर पोलीस पुढील तपास करत आहेत.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिप