हल्ली विवाहबाह्य संबंध आणि त्यामधून घडणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील महाराजपूर येथे घडली आहे. येथील रहिवासी असलेल्या सचिन सिंह याने पत्नी श्वेता सिंह हिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची माहिती दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मूळचा फतेहपूर येथील रहिवासी असलेल्या सचिन सिंह याचा चार महिन्यांपूर्वीच श्वेता सिंह हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र त्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. शुक्रवारी रात्री सचिनने श्वेता हिला इंजिनियरिंगचे विद्यार्थी असलेल्या दोन तरुणांसोबत आक्षेपार्ह स्थितीत चाळे करताना पाहिले. त्यानंतर या चौघांमध्ये वाद झाला. तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून सदर तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर हा वाद मिटला. मात्र घरी परतल्यानंतर श्वेता हिने त्या तरुणांना सोडवून आणण्यासाठी सचिनवर दबाव आणला. त्यामुळे संतापलेल्या सचिनने पत्नी श्वेता हिचा गळा आवळून खून केला.
पत्नीची हत्या केल्यानंतर सचिन हा पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने दिलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. सचिनने पोलिसांना सांगितले की, पत्नीवर संशय आल्यानंतर मी तिला रंगेहात पकडण्यासाठी एक योजना आखली. तसेच गावी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलो. शुक्रवारी रात्री जेव्हा घरी परतलो, तेव्हा पत्नी बेडवर दोन तरुणांच्या मध्ये झोपलेली असल्याचं मला दिसलं. जेव्हा मी याचा व्हिडीओ चित्रित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पत्नीने त्याच तरुणांकरवी मला मारहाण केली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तिथे मी तडजोड करून प्रकरण मिटवणार असल्याचे सांगितले आणि घरी परतलो, अशी माहिती त्याने दिली.
दरम्यान, घरी आल्यानंतर तेव्हा श्वेता हिने पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही तरुणांना सोडवण्यासाठी सचिनवर दबाव आणला. तसेच असं न केल्यास त्याला सोडून त्या तरुणांसोबत राहण्यासाठी जाईन, अशी धमकी तिने सचिनला दिली. त्यामुळे संतापलेल्या सचिनने श्वेता हिचा गळा आवळून तिची हत्या केली. श्वेता हिची हत्या केल्यानंतर सचिन पोलीस ठाण्यात गेला आणि आपण पत्नीची हत्या केली असून, तिचा मृतदेह घरात पडला आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यांतर पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, मी श्वेतासाठी आपलं घर, कुटुंब सोडलं मात्र तिने माझी फसवणूक केली, अशा शब्दात सचिनने संताप व्यक्त केला.
Web Summary : Kanpur man killed his wife after finding her with two men. He confessed to police, citing suspicion and her threat to leave him. He strangled her in rage.
Web Summary : कानपुर में एक व्यक्ति ने अपनी पत्नी को दो पुरुषों के साथ देखने के बाद उसकी हत्या कर दी। उसने पुलिस को बताया कि उसे शक था और पत्नी ने उसे छोड़ने की धमकी दी थी। गुस्से में उसने गला घोंट दिया।