मायलेकीची गळा चिरून हत्या, दरवाजा बंद, घरात काहीच हालचाल दिसेना, शेजाऱ्यांना आला संशय़, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:34 IST2025-01-16T19:32:52+5:302025-01-16T19:34:13+5:30
Uttar Pradesh Crime News: लखनौमधील मलिहाबादमध्ये डबल मर्डरच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे एका सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

मायलेकीची गळा चिरून हत्या, दरवाजा बंद, घरात काहीच हालचाल दिसेना, शेजाऱ्यांना आला संशय़, त्यानंतर...
लखनौमधील मलिहाबादमध्ये डबल मर्डरच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे एका सहा वर्षांची मुलगी आणि तिच्या आईची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलिहाबादमधील इशापूर गावामध्ये ही घटना घडली आहे. येथे आई गीता (२५) आणि मुलगी दीपिका (६) यांची हत्या करण्यात आली. हत्येमागचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत. तसेच आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणावाची परिस्थिती असल्याने पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ईशापूर गावामध्ये प्रकाश कनौजिया यांच्या घराचे दरवाजे बराच वेळ न उघडल्याने तसेच घरामधून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र आतून काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे दरवाजा तोडला असता आतमध्ये आई आणि मुलीचे मृतदेह धारदार हत्याराने गळा कापलेल्या स्थितीत दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डीसीपी पश्चिम यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासामध्ये आपापसातील वादातून ही घटना घडली असल्याचे दिसत आहे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.