Uttar Pradesh Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय, यूपीमधील सर्व सभा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:21 PM2022-01-05T13:21:08+5:302022-01-05T13:23:42+5:30

Uttar Pradesh Corona: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांची नोएडामधील सभा रद्द केली आहे.

Uttar Pradesh Corona: Congress canceled all rally in UP on the backdrop of Corona | Uttar Pradesh Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय, यूपीमधील सर्व सभा रद्द

Uttar Pradesh Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मोठा निर्णय, यूपीमधील सर्व सभा रद्द

Next

नवी दिल्ली : देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे.  अनेक राज्यात निवडणुका होणार आहेत, पण या निवडणुकांवर कोरोनाचे सावट आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या काँग्रेस पक्षाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द केले आहेत. उत्तर प्रदेशातील बरेली येथे शेकडो मुली आणि महिलांनी काँग्रेसच्या 'लड़की हूं, लड सकती हूं' मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच, कुणीच मास्क घातला नव्हता, त्यामुळे पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गुरुवारी नोएडा येथे होणारी रॅली रद्द केली आहे. नोएडातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नोएडामध्ये संपूर्ण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने जिल्हा माहिती अधिकारी राकेश चौहानच्या हवाल्याने सांगितले की, "कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्र्यांना मेरठ मंडळातील सुमारे 2000 विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि स्मार्टफोनचे वाटप करायचे होते. यादरम्यान मुख्यमंत्री नोएडा प्राधिकरणासाठी सुमारे 400 कोटी रुपये आणि ग्रेटर नोएडासाठी सुमारे 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि उद्घाटन करणार होते.

मात्र, काँग्रेसप्रमाणे भाजपही आपले सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हजारो लोक निवडणूक रॅलीत पोहोचत असल्याने कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करणे कठीण आहे. भारतातील कोरोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेसमध्ये अशी गर्दी जमणे चिंतेचे कारण आहे.

मॅरेथॉनमध्ये नियमांची पायमल्ली

मंगळवारी, काँग्रेसच्या बरेली मॅरेथॉनमधून भितीदायक व्हिडिओ समोर आला होता. हजारो महिला आणि मुली मास्कशिवाय पोहोचल्या होत्या. अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या मॅरेथॉनमध्ये, कोविड प्रोटोकॉलची पायमल्ली होताना दिसली. मंगळवारी जेव्हा बरेलीमध्ये मॅरेथॉन सुरू झाली तेव्हा मुली पुढे सरकल्या आणि पडल्या, एक एक करून सुमारे 15-20 मुली रस्त्यावर पडल्या. यामध्ये तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या.

Web Title: Uttar Pradesh Corona: Congress canceled all rally in UP on the backdrop of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.