UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:54 PM2021-04-13T19:54:03+5:302021-04-13T19:54:38+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Uttar Pradesh CM Yogi Adityanath said i have been isolated myself | UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट

UP : मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, योगी आदित्यनाथांनी स्वतःला केलं आयसोलेट

Next

लखनौ - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. आता याचा प्रकोप उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. त्यांच्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता सर्व कामे व्हर्च्युअली करतील. (Uttar Pradesh CM Yogi Adityanath said i have been isolated myself)

योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात ट्विटर करून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ''माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कोरोना संक्रमित झाले आहेत. हे अधिकारी माझ्या संपर्कात होते, त्यामुळे खबरदारी म्हणून मी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि सर्व कामे व्हर्च्युअली सुरू करत आहे.''

CoronaVirus Update : 'या' 10 राज्यांत कोरोनाचा कहर, महाराष्ट्रासह तीन राज्यांची स्थिती सर्वात वाईट!

उत्तर प्रदेशात कोरोनाचं थैमान -
उत्तर प्रदेशातही कोरोनाने थैमान घातले आहे. येथेही कोरोनाने मागील सर्वच विक्रम मोडले आहेत. गेल्या 24 तासांत येथे तब्बल 18,021 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी ही माहिती दिली. तर गेल्या 24 तासांत 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी राज्‍यात 11 एप्रिलला एका दिवसात सर्वाधिक 15,353 नवे कोरोबाधित आढळून आले होते. तर 12 एप्रिलला एका दिवसात सर्वाधिक 72 सक्रमितांचा मृत्यू झाला होता.

Coronavirus vaccine update : आता जगातील प्रत्येक लस मिळणार भारतात; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय!

अमित मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात डिस्चार्ज देण्यात आलेल्या लोकांची संख्या 3,474 आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 95,980 एवढी आहे. आतापर्यंत एकूण 9,309 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच आतापर्यंत उत्तर प्रेदेशात 3,71,73,548 सॅम्पलची तपासणी झाली आहे.

Web Title: Uttar Pradesh CM Yogi Adityanath said i have been isolated myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.