हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 09:01 PM2018-09-30T21:01:41+5:302018-10-01T07:35:16+5:30

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीवरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे.

Using CNG car...Prices increased by 1.70 ruppies | हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला

हेच का अच्छे दिन ? आता विनाअनुदानित सिलेंडरही 59 रुपयांनी महागला

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना प्रदूषणापासून वाचविणाऱ्या सीएनजीसह घरगुती गॅस आणि विमान प्रवासावरही दरवाढीची वक्रदृष्टी पडली आहे. केंद्र सरकारने दिल्लीमध्ये सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढविला असून नोएडामध्ये 1.95 रुपयांनी दर वाढविला आहे. तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी वाढविल्याने सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची दिवाळीही महागणार आहे.

 


इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. रुपयाचे अवमुल्यन आणि आंतराष्ट्रीय बाजारात तेलाचे वाढत चाललेले भाव इंधनाच्या दरांवर परिणाम करत असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90.84 आणि डिझेल 79.40 वर पोहोचले आहेत. तर सीएनजी 44.22 च्या आसपास आहे. 


केंद्र सरकराने आज वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना तिहेरी शॉक दिला आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 59 रुपयांची वाढ केली. तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ करण्य़ात आली आहे. 


तसेच विमानाच्या इंधनाचीही 2650 रुपये प्रतिकिलो लिटरला विक्री केली जाणार आहे. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. एक किलो लिटरमध्ये 1000 लीटर इंधन मिळते.


सीएनजीची ही दरवाढ देशभरात लागू झाल्यास आज मध्यरात्रीपासून प्रती किलोला 46 रुपयांच्या आसपास सीएनजी विकला जाणार आहे. यामुळे आधीच महागाईने पिचलेल्या कारचालकांना तुलनेने स्वस्त असलेल्या सीएनजीच्या दरवाढीमुळे खिशाला कात्री लागणार आहे. 

याआधी 1 एप्रिलला 77 पैशांची वाढ झाली होती.
 

Web Title: Using CNG car...Prices increased by 1.70 ruppies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.