शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम आशियातील संकटात फ्रान्सनं दिले भारताला आमंत्रण; जी-७ देशांच्या बैठकीकडे जगाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:37 IST

इराण युद्धामुळे जी-७ बैठकीचे महत्त्व वाढले आहे. जी-७ सदस्य देशांना या जागतिक व्यासपीठावर केवळ आर्थिक आणि वित्तीय मुद्द्यांवरच नव्हे तर जगासमोरील भू-राजकीय आव्हानांवरही चर्चा करू शकतात

नवी दिल्ली - पश्चिम आशियातील संकटात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुरुवारी फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. त्याठिकाणी जयशंकर हे जी ७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. मध्य पूर्वेत सुरू असलेले अमेरिका, इस्रायलविरुद्ध इराण युद्ध आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जल वाहतुकीवर झालेला परिणाम या मुद्द्यांवर या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे.

परराष्ट्र मंत्री फ्रान्समध्ये जी ७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठकीत सहभागी होत पश्चिम आशियातील संकट आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काय मार्ग काढता येईल त्यावर चर्चा करतील. गुरुवारी इराणकडून अधिकृतपणे भारत, रशिया, चीन, इराक आणि पाकिस्तानसाठी होर्मुझ मार्ग खुला केल्याची घोषणा केली आहे. जी-७ जगातील सात समृद्ध आणि शक्तिशाली अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांची संघटना आहे. भारत या संघटनेचा सदस्य नाही परंतु जी-७ चे सध्याचे अध्यक्ष या नात्याने फ्रान्सचे युरोप आणि परराष्ट्र खात्याचे मंत्री जीन नोएल बॅरो यांनी भारताला आमंत्रित केले आहे. जी-७ या संघटनेत फ्रान्स, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, यूनाइटेड किंगडम, यूरोपियन यूनियन यांचा समावेश आहे.

फ्रान्ससोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, एस.जयशंकर हे २६ आणि २७ मार्च रोजी फ्रान्सच्या एबे डेस वॉक्स डे सेने याठिकाणी राहतील. जी-७ बैठकीत सहभाग घेण्यासोबतच परराष्ट्र मंत्री तेथील त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. फ्रान्सने भारत, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया आणि ब्राझील यांना जी-७ बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या वेळी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची फ्रान्समधील उपस्थिती महत्त्वपूर्ण आहे, कारण तो देशदेखील आखाती युद्धातील इराणच्या हल्ल्यांच्या धक्क्यातून सावरत आहे.

जी-७ देशांच्या बैठकीकडे जगाचे लक्ष

दरम्यान, इराण युद्धामुळे जी-७ बैठकीचे महत्त्व वाढले आहे. जी-७ सदस्य देशांना या जागतिक व्यासपीठावर केवळ आर्थिक आणि वित्तीय मुद्द्यांवरच नव्हे तर जगासमोरील भू-राजकीय आव्हानांवरही चर्चा करू शकतात आणि समन्वयाने त्यासाठी पावले उचलू शकतात. यावेळी जी-७ बैठकीचे एक सत्र पूर्णपणे पश्चिम आशिया संकटासाठी समर्पित असेल. तणाव कमी करण्यासाठी आणि सागरी मार्गांमधील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा कशी पुढे न्यावी, यावरही परराष्ट्र मंत्री चर्चा करतील. त्याशिवाय इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांना कसे हाताळावे यावरही चर्चा होईल असं फ्रान्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : France invites India to G7 amidst West Asia crisis.

Web Summary : Jaishankar attends G7 meet in France amid West Asia crisis. Discussions focus on Iran conflict, Hormuz Strait, and maritime security. India, though not a member, is invited by France. Bilateral talks with counterparts are expected.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतFranceफ्रान्सAmericaअमेरिकाIranइराण