'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:01 IST2026-01-09T18:01:21+5:302026-01-09T18:01:50+5:30
US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार कराराबाबत अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील प्रस्तावित व्यापार करार (Trade Deal) अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, हॉवर्ड लुटनिक यांनी दावा केला की, व्यापार करार अंतिम होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नाही, त्यामुळेच करार पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, हा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.
पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, भारत आणि अमेरिका गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून द्विपक्षीय व्यापार करारावर सातत्याने चर्चा करत आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक फेऱ्यांमध्ये वाटाघाटी झाल्या आहेत. हॉवर्ड लुटनिक यांच्या वक्तव्यात या चर्चांचे जे वर्णन करण्यात आले आहे, ते अचूक नाही.
Starting shortly!
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 9, 2026
🎥 Tune in for our Weekly Media Briefing ⬇️https://t.co/1ns4XXaVmX
जायसवाल यांनी पुढे सांगितले की, 2025 या वर्षात पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून एकूण 8 वेळा संवाद झाला आहे. या चर्चांमध्ये भारत-अमेरिका व्यापक भागीदारीचे विविध पैलू समाविष्ट होते. अनेक वेळा आपण करार अंतिम करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापार करारावर भारत-अमेरिकेची भूमिका
MEA च्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी 2025 पासून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एका संतुलित आणि परस्पर लाभदायक द्विपक्षीय व्यापार करारासाठी कटिबद्ध आहेत. भारताने स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक असून, त्यामुळे समान फायद्याचा करार होणे शक्य आहे. सध्या भारत-अमेरिका व्यापार करार अद्याप अंतिम न झाल्याने, भारताला अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफचा सामना करावा लागत आहे.