UPSC Civil Services Result 2019 : rahul modi gets 420th rank | UPSC परीक्षेत राहुल मोदीचा 420वा रँक, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

UPSC परीक्षेत राहुल मोदीचा 420वा रँक, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

ठळक मुद्देया परीक्षेत सोनिपतचा प्रदीप सिंह टॉपर ठरला. या निकालातील जाहीर करण्यात आलेल्या एकूण 829 उमेदवारांच्या यादीत राहुल मोदीचाही समावेश आहे.लोक राहुल मोदीचा संबंध थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाशी जोडत आहेत.

नवी दिल्ली -केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) वतीने 2019च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल आज घोषित करण्यात आला. फेब्रुवारी-ऑगस्टमध्ये झालेल्या मुलाखतींनंतर यूपीएससीने मेरिट लिस्ट जारी केली आहे. या परीक्षेत सोनिपतचा प्रदीप सिंह टॉपर ठरला. दुसरा क्रमांक जतिन किशोर याचा आला तर तिसरा क्रमांक प्रतिभा वर्मा हिने पटकावला आहे. या निकालातील जाहीर करण्यात आलेल्या एकूण 829 उमेदवारांच्या यादीत राहुल मोदीचाही समावेश आहे.

या निकालानंतर योगायोगाने टॉपरपेक्षाही अधिक चर्चा सुरू आहे, ती 420व्या स्थानावर असलेल्या राहुल मोदीची. लोक, या उमेदवाराच्या नावाचा संबंध थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाशीच जोडत आहेत. ट्विटरवर तर या उमेदवाराच्या नावाने मीम्सचा महापूर आला आहे. युझर्स यावरून नाना प्रकारचे चुटकुले तयार करत आहेत.

या निकालात 420व्या रँकवर असलेल्या उमेदवाराचे नाव 'राहुल मोदी' आहे. त्याचा रोल नंबर 6312980 असा आहे.

यूपीएससी परीक्षेत प्रीलिम्स आणि मेन्स परीक्षा पास झाल्यानंतर तिसरा टप्पा इंटरव्ह्यूचा असतो. यावेळी कोरोनाचे सावट असल्याने काही इंटरव्ह्यू स्थगित करण्यात आले होते. नंतर जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले, त्यांना यूपीएससीने विविध प्रकारच्या सुविधा दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

पाकिस्ताननं जारी केला नवा नकाशा; काश्मीर-लडाखच नाही, 'या' भागावरही सांगितला दावा!

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: UPSC Civil Services Result 2019 : rahul modi gets 420th rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.