Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 11:18 IST2025-11-08T11:17:54+5:302025-11-08T11:18:42+5:30
पानीपत-खटीमा महामार्गावरील बुटराडा उड्डाणपुलाजवळ एका वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅन्टरला जोरदार धडक दिली.

Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. पानीपत-खटीमा महामार्गावरील बुटराडा उड्डाणपुलाजवळ एका वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅन्टरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार चरखीदादरी येथून येत असल्याचं सांगितलं जात आहे. हे चारही तरुण मुझफ्फरनगरकडे जात होते. बुटराडा उड्डाणपुलाजवळ येताच कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कॅन्टरच्या मागील बाजूस आदळली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की जवळच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला, ज्यामध्ये चारही तरुण अडकले. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गॅस कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
शामली/पानीपत खटीमा हाईवे पर हादसा। तेज रफ्तार स्विफ्ट कार अनियंत्रित होहाईवे किनारे कैंटर मे जा घुसी। कार सवार चार दोस्तों की मौत। सभी हरियाणा के रहने वाले थे मुजफ्फरनगर जा रहे थे। टक्कर के बाद कार के परखच्चे उड़े। #Accident#Shamlipic.twitter.com/cyuTfK4npr
— Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) November 8, 2025
माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह आणि बाबरी पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कॅन्टर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. कॅन्टर चालक सध्या फरार आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की कार चरखीदादरी येथील आहे आणि चारही तरुण मुझफ्फरनगरकडे जात होते.
घटनास्थळी तपासादरम्यान, कारमध्ये दारूच्या बाटल्या देखील आढळल्या. यामुळे अपघाताच्या वेळी कारमधील तरुण दारूच्या नशेत असल्याचा संशय निर्माण होतो. पोलीस आता या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनलाही माहिती पाठवण्यात आली आहे.
या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी रस्ता मोकळा केला आणि वाहतूक पूर्ववत केली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या उड्डाणपुलाजवळ वारंवार अपघात होतात, तरीही रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, असं त्यांचं म्हणणं आहे.