उमेदवाराने बिर्याणी पार्टीचे आयोजन केले; लोकांनी बिर्याणीचे भांडेच पळवले, व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 14:55 IST2023-05-04T14:54:50+5:302023-05-04T14:55:02+5:30
UP Nikay Chunav 2023: नगरसेवक पदाच्या उमेदवाराने वॉर्डातील मतदारांसाठी बिर्याणीचे आयोजन केले होते.

उमेदवाराने बिर्याणी पार्टीचे आयोजन केले; लोकांनी बिर्याणीचे भांडेच पळवले, व्हिडिओ व्हायरल...
UP Nikay Chunav 2023: सध्या उत्तर प्रदेशमध्ये विविध शहरात नगरपालिका निवडणूका होत आहेत. यादरम्यान मेरठमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका उमेदवाराने आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी बुधवारी सायंकाळी बिर्याणी पार्टीचे आयोजन केले होते. पण, पार्टी सुरू होताच लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, यावेळी अनेकांनी धक्काबुक्कीही केली. यावेळी काही लोकांना चक्क बिर्याणीचे भांडेच पळवले. या संदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी कारवाई केली आणि शांतता भंग आणि आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठमधील नौचंडी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. येथील समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने आपल्या वॉर्डातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी बिर्याणी पार्टी आयोजित केली होती. पण, लोकांची झुंबड उडाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
वोटरों को लुभाने के लिए बांटी गई शाही बिरयानी, "बिरयानी का देग" लेकर भागते लोगो का सोशल मीडिया पर हुआ वीडियो वायरल..मेरठ के नौचंदी थाना क्षेत्र के वार्ड 80 से पार्षद प्रत्याशी पर वोटरों को लुभाने के लिए बिरयानी की दावत करने का है आरोप,पुलिस कर रही है जांच।#Meerutpic.twitter.com/Yto0Cs59CD
— ANMOL Sharma (@anmolmeeruthiya) May 4, 2023
मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली आणि बिर्याणी कमी पडली. काहींनी आधी बिर्याणी खाल्ली आणि नंतर बॅगमध्ये भरुन न्यायला सुरुवात केली. यामुळे उरलेल्या बिर्याणीवर ताव मारण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी काहींनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमणावर व्हायरल होत आहे. टीव्ही9 हिंदीने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.