Video: दिवाळीच्या रात्री पत्नीने घराचा दरवाजा उघडला नाही, संतापलेल्या पतीने पेटवून घेतले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 15:16 IST2025-10-22T15:15:41+5:302025-10-22T15:16:07+5:30
UP News: उपचारादरम्यान पतीचा मृत्यू.

Video: दिवाळीच्या रात्री पत्नीने घराचा दरवाजा उघडला नाही, संतापलेल्या पतीने पेटवून घेतले...
UP News: दिवाळीच्या रात्री गाजियाबादमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना मानवी असहायतेची आणि कौटुंबिक तणावाच्या भीषण परिणतीचे जिवंत उदाहरण ठरले आहे. नंदग्राम परिसरात पत्नीने घराचा दरवाजा न उघडल्याने संतापलेल्या पतीने स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहन केले.
मृत व्यक्तीचे नाव टिंकू कुमार असे असून, तो मुळचा मेरठ जिल्ह्यातील सरधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरपूर गावचा रहिवासी होता. तो गाजियाबादच्या नंदग्राम भागातील नूरनगरमध्ये आपल्या पत्नी व मुलांसह राहत होता. टिंकू मजुरी करुन संसार चालवायचा. मागील दीड महिन्यांपासून दांपत्यामध्ये वाद सुरू होता, त्यामुळे टिंकू अनेकदा घराबाहेरच राहायचा.
नंदग्राम में दिवाली पर नाराज़ पत्नी ने गेट नहीं खोला तो युवक ने खुद को लगाई आग। अस्पताल में हुई मौत।@ghaziabadpolice@Uppolicepic.twitter.com/7q8Z0beECe
— Ankit tiwari/अंकित तिवारी (@journo_ankit) October 22, 2025
दिवाळीच्या रात्री सुमारास रात्री दोन वाजता तो दारुच्या नशेत पत्नीला समजावण्यासाठी घरी आला. त्याने दरवाजा वाजवला, पण पत्नीने दरवाजा उघडला नाही. संतापलेल्या टिंकूने पत्नीला धमकी दिली की, जर दरवाजा उघडला नाही, तर तो स्वतःला पेटवेल. पत्नीने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या डिझेलच्या बाटलीतील इंधन स्वतःवर ओतून पेटवून घेतले.
CCTV मध्ये संपूर्ण घटना कैद
या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. त्यात टिंकू घराच्या बाहेर बसलेला दिसतो आणि काही क्षणांतच स्वतःवर डिझेल ओतून पेटवून घेतो. नंतर तो जळत गल्लीत इकडेतिकडे धावायला लागतो. जळालेल्या अवस्थेत त्याने शेजाऱ्यांचे दार ठोठावले, मदतीसाठी हाक दिली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. शेजाऱ्यांनी कपडा व माती टाकून आग विझवली आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलीसांनी टिंकूला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथून त्याला दिल्लीला रेफर करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. ACP नंदग्राम उपासना पांडे यांनी सांगितले की, ही घटना पूर्णपणे कौटुंबिक वादातून घडलेली आहे. कुटुंबींयाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात येईल.