UP MLC Election: विधानसभेनंतर विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय, 40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:52 PM2022-04-12T12:52:16+5:302022-04-12T12:54:56+5:30

UP MLC Election: 9 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या 27 जागांसाठी मतदान पार पडले. आज निकाल लागला असून, यात भाजपने समाजवादी पक्षाचा सुपडा साफ केला आहे.

UP MLC Election | BJP's big victory in the Legislative Council after the Vidhan Sabha, a repeat of history after 40 years | UP MLC Election: विधानसभेनंतर विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय, 40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

UP MLC Election: विधानसभेनंतर विधान परिषदेतही भाजपचा मोठा विजय, 40 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

Next

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर भाजपने विधान परिषद निवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. विधानसभेत बहुमतासोबतच आता भाजपला विधान परिषदेतही बहुमत मिळाले आहे. विधानसभेत आणि विधानपरिषदेत एका पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्याचे 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडत आहे. 9 एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत 36 पैकी 27 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 24 जागा जिंकल्या आहेत. 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, समाजवादी पक्षाला एकही जागा जिंकका आली नाही.

यापूर्वी 1982 मध्ये काँग्रेसला दोन्ही सभागृहात बहुमत मिळाले होते, त्यानंतर आता भाजपने हा कारानामा करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या 9 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 9 एप्रिल रोजी 27 जागांसाठी मतदान झाले होते, त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत भाजपने 27 पैकी 24 जागा जिंकल्या आहेत. तीन जागा अपक्षांनी जिंकल्या. समाजवादी पक्षाला यात खातेही उघडता आले नाही. सपाचा बालेकिल्ला असलेल्या आझमगडमध्येही पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. येथून भाजपमधून हकालपट्टी झालेले यशवंत सिंह यांचे पुत्र विक्रांत सिंह रिशू यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला आहे.

विधान परिषदेत भाजपला बहुमत
33 जागांच्या विजयासह भाजपला वरच्या सभागृहात बहुमत मिळाले आहे. सध्या 100 पैकी भाजपचे 35 आमदार होते, आता 33 आमदारांच्या विजयामुळे ही संख्या 68 वर पोहोचली आहे. हा आकडा 51च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहे. समाजवादी पक्षाचे सध्या 17 आमदार आहेत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर आता विधान परिषदेमध्येही विधेयके मंजूर करणे सरकारला सोपे होणार आहे.

वाराणसीत भाजपला मोठा झटका

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने अधिकांश जागा जागा जिंकल्या आहेत. पण, भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मात्र, भाजपला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत वाराणसीमध्ये भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या जागेवर ब्रिजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह विजयी झाल्या आहेत. अन्नपूर्णा सिंह यांना 2058 मते मिळाली आहेत. सपा उमेदवार उमेश यादव 171 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. भाजप उमेदवार डॉ. सुदामा पटेल 103 मतांसह तीसऱ्या क्रमांकावर आहेत. तर 68 मते रद्द झाली आहेत.

Web Title: UP MLC Election | BJP's big victory in the Legislative Council after the Vidhan Sabha, a repeat of history after 40 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.