Video: पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध; पतीने बेडवर रंगेहात पकडले अन् आवळला गळा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:06 IST2026-01-21T19:06:04+5:302026-01-21T19:06:42+5:30

चार महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न.

UP man finds wife with 3 men, kills her and surrender before police | Video: पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध; पतीने बेडवर रंगेहात पकडले अन् आवळला गळा...

Video: पत्नीचे दोन तरुणांसोबत संबंध; पतीने बेडवर रंगेहात पकडले अन् आवळला गळा...

UP Crime: उत्तर प्रदेशातील कानपूर येथे अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने दुसऱ्या दिवशी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि गुन्ह्याची कबुली दिली. या हत्येमागचे कारण ऐकून पोलिसही हैरान झाले. आरोपीच्या कबुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सचिन सिंह, तर मृत महिलेचे नाव श्वेता सिंह आहे. गेल्या महिन्याभरापासून हे दाम्पत्य भाड्याच्या खोलीत राहत होते. अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन त्यांनी चार महिन्यांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते.

नेमकं काय झालं?

पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिनने सांगितले की, तो कामानिमित्त घराबाहेर असताना श्वेताचे घराजवळ राहणाऱ्या दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांशी शारिरीक संबंध निर्माण झाले. दोन दिवसांपूर्वी तो गावाला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता; मात्र शुक्रवारी रात्री अचानक घरी परतला असता, त्याने पत्नीला दोन्ही तरुणांसोबत बेडवर रंगेहात पकडले. त्याने मोबाईलवर व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्नीच्या दोन्ही प्रियकरांनी सचिनला मारहाण केली.

पुढे पत्नीने त्या दोघांसोबत निघून जाण्याची धमकी दिली. यादरम्यान, पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात पत्नीने मला मारून टाक असे म्हटल्यावर, संतापाच्या भरात सचिनने पत्नीचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह चादरीत गुंडाळून निघून गेला. हत्येच्या दुसऱ्या दिवशी सचिन जवळच्या पोलिस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन खोलीत तपास केला असता, श्वेताचा मृतदेह चादरीत गुंडाळलेला आढळून आला.

Web Title : पत्नी को तीन पुरुषों के साथ पाकर पति ने गला घोंटा।

Web Summary : कानपुर में, एक पति ने अपनी पत्नी को कई पुरुषों के साथ देखने के बाद उसकी हत्या कर दी। उसने पुलिस के सामने आत्मसमर्पण कर दिया, और कबूल किया कि उसने गुस्से में उसका गला घोंट दिया क्योंकि उसने उसे पुरुषों के साथ फंसाने की धमकी दी थी।

Web Title : Husband Strangles Wife After Finding Her With Three Men.

Web Summary : In Kanpur, a husband murdered his wife after discovering her with multiple men. He surrendered to police, confessing he strangled her in a fit of rage after she threatened to involve him with the men.