UP Crime : गाझियाबाद पोलिसांनी नहल गावातील कुख्यात हिस्ट्रीशीटर कादिरला एका चकमकीत अटक केली आहे. या कादिरला पकडण्यासाठी नोएडा पोलिसांनी रविवारी गाझियाबादमध्ये छापा टाकला होता. यावेळी, कादिरच्या साथीदारांनी पोलिस पथकावर दगडफेक आणि गोळीबार केला. गोळीबारात नोएडा पोलिस कॉन्स्टेबल सौरभ देशवाल यांचा मृत्यू झाला, तर 3 पोलिस जखमी झाले.
पोलिसांवर हल्ला झाला.मिळलेल्या माहितीनुसार, हिस्ट्रीशीटर कादिरच्या शोधात नोएडा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री गाझियाबादला पोहोचले अन् आरोपीला त्याच्या घरातून अटक केली. यादरम्यान कादिरच्या साथीदारांनी पोलिस पथकावर दगडफेक आणि गोळीबार केला. या घटनेत नोएडा पोलिस कॉन्स्टेबल सौरभ देशवाल यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पायात गोळी लागल्यानंतर अटकया चकमकीत समोरासमोर झालेल्या गोळीबारात पोलिसांनी आरोपी कादिरच्या पायात गोळी झाडून त्याला पकडले. सध्या आरोपी रुग्णालयात असून, डिस्चार्ज मिळाल्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल. आता पोलिस त्याच्या साथीदारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, मसुरी पोलिसांनी आरोपीच्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
23 वर्षीय कादिरवर गंभीर गुन्हेगाझियाबादच्या नहल गावातील रहिवासी कादिर हा फक्त 23 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयात त्याच्यावर गाझियाबाद आणि नोएडासह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये 24 हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गँगस्टर कायद्याव्यतिरिक्त, दरोडा, हल्ला, हत्येचा प्रयत्न आणि गायींची तस्करी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याच्या प्रयत्नात होते.