निळ्या ड्रमची भीती! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडले, पतीने घेतला मोठा निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:52 IST2025-12-09T12:51:56+5:302025-12-09T12:52:27+5:30
UP Crime: मेरठमधील सौरभ हत्याकांडाने सर्व देश हादरला होता.

निळ्या ड्रमची भीती! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहात पकडले, पतीने घेतला मोठा निर्णय...
UP Crime: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या एका घटनेने सौरभ हत्याकांडाची आठवण झाली. एका पतीने जीवाच्या भीतीपोटी पत्नीला तिच्या प्रेमीसोबत जाण्याची परवानगी दिली. गावातील जबाबदार नागरिकांच्या उपस्थितीत हे प्रकरण परस्पर सहमतीने निकाली काढण्यात आले.
निळ्या ड्रमची दहशत...
मेरठमधील ‘निळा ड्रम हत्याकांड’ (सौरभ हत्याकांड) आजही लोकांच्या मनात घर करुन आहे. त्या हत्याकांडात पत्नीने प्रियकरासोबत मिळून पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. तसेच, त्याचे तुकडे निळ्या ड्रममध्ये टाकून, तो ड्रम सिमेंटने भरला होता. त्या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला होता. आपली अशीच अवस्था होईल, या भीतीने सरुरपुरमधील एका युवकाने आश्चर्यकारक निर्णय घेतला.
पत्नीला प्रियकरासोबत रंगेहातपकडले...
संबंधित तरुणाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. यानंतर मोठा गोंधळ उडाला. पत्नीने स्पष्टपणे सांगितले की, तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. यासाठी तिने माहेर आणि सासरच्या लोकांसोबत गावातील प्रमुखांना बोलावले. सर्वांसमोर पतीने, पत्नीला तिच्या प्रियकरासोबत जाण्याची परवानगी दिली. यादरम्यान, पती म्हणाला की, काय माहित, माझा शेवटही सौरभ हत्याकांडासारखा झाला असता. त्यामुळे मी तिला स्वतःहून सोडून देण्याचा निर्णय घेतला. सध्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.