UP Assembly Election 2022: ओवेसींच्या कारवरील गोळीबार ध्रुवीकरणासाठी, सपा आणि काँग्रेसने केला हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:15 IST2022-02-05T07:14:13+5:302022-02-05T07:15:03+5:30
UP Assembly Election 2022: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे.

UP Assembly Election 2022: ओवेसींच्या कारवरील गोळीबार ध्रुवीकरणासाठी, सपा आणि काँग्रेसने केला हल्लाबोल
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, पराभवाच्या भीतीने भाजपा ध्रुवीकरणाच्या प्रयत्नात आहे. सपाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी म्हणाले की, हे काम एका व्यक्तीचे नाही.
यामागे मोठे कारस्थान आहे. याची चौकशी होण्याची गरज आहे. भाजपाकडे इशारा करून ते म्हणाले की, गोळीबारामागे ध्रुवीकरणाचा हेतू स्पष्ट दिसत आहे.