UP AIMIM: उत्तर प्रदेशातील मेरठ येथे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात AIMIM चे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी आक्रमक भूमिका घेतली असून 2027 विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय रणशिंग फुंकल्याचे चित्र दिसून आले. यावेळी त्यांनी राज्यात होणारे एनकाउंटर आणि बुलडोझर कारवाईच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.
11 आमदार द्या, एनकाउंटर थांबवू
मेरठमधील जनसभेत बोलताना शौकत अली यांनी दावा केला की, जर जनतेने त्यांच्या पक्षाला 111 नाही, तर फक्त 11 आमदार जिंकवून दिले, तरी राज्यात कोणत्याही मुस्लिमाचा एनकाउंटर होऊ देणार नाही. त्यांनी मंचावरून असेही म्हटले की, त्यानंतरही एनकाउंटर झाला, तर एनकाउंटर करणाऱ्यांचा एनकाउंटर करू. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
विरोधी पक्षांवरही निशाणा
शौकत अली यांनी नाव न घेता समाजवादी पक्षावर टीका केली. त्यांनी म्हटले की, जनतेने ज्यांना 111 आमदार निवडून दिले, ते आज शांत बसले आहेत. आरोपांच्या आधारावर घरांवर बुलडोझर चालवले गेले आणि गोळीबार झाला, पण मत मागणारे नेते आता आम्ही सरकारमध्ये नाही, असे सांगून जबाबदारी टाळत आहेत. यावेळी शौकत अली यांनी समर्थकांना घराघरात जाऊन अन्याय झाल्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
2027 निवडणुकीसाठी राजकीय संदेश
या कार्यक्रमातील आक्रमक भाषणामुळे AIMIM पक्षाने 2027 विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मेरठमधील या शक्तिप्रदर्शनाद्वारे पक्षाने मुस्लिम मतदारांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Web Summary : AIMIM's Shaukat Ali vowed to retaliate against police encounters of Muslims in Uttar Pradesh if his party wins 11 seats in the 2027 elections. He criticized the government and opposition for inaction.
Web Summary : AIMIM के शौकत अली ने उत्तर प्रदेश में मुसलमानों के पुलिस मुठभेड़ों के खिलाफ जवाबी कार्रवाई करने की कसम खाई, अगर उनकी पार्टी 2027 के चुनावों में 11 सीटें जीतती है। उन्होंने सरकार और विपक्ष की निष्क्रियता की आलोचना की।