शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधील अनोखी शाळा! येथे दिले जातेय आमदार बनण्याचे प्रशिक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 19:48 IST

सत्ता आणि पैसा हाती एकवटत असल्याने आमदार खासदार बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्हीही राजकारणात उतरून राजकीय पद मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पुष्कर - सत्ता आणि पैसा हाती एकवटत असल्याने आमदार खासदार बनण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असतात. तुम्हीही राजकारणात उतरून राजकीय पद मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राजस्थानमध्ये अशी एक शाळा आहे जिथे राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या व्यक्तींना आमदार बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते. येथील शाळेत याच आठवड्यात एक विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. ज्यात तरुणांना आमदार बनण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एका बिगर शासकीय संघटनेकडून या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणास असून, राज्यात पर्यायी राजकारणासाठी वातावरण निर्मिती करणे हे या शिबिराचे उद्दिष्ट आहे.  अभिनव राजस्थान या एनजीओने ही राजकीय प्रशिक्षण देणाऱ्या शाळेची संकल्पना समोर आणली आहे. या एनजीओचे संस्थापक डॉ. अशोक चौधरी म्हणाले,  हे प्रशिक्षण शिबीर एका अभियानाची सुरुवात आहे. त्याचा प्रारंभ 14-15 ऑक्टोबरला पुष्कर येथे होणाऱ्या आमदार प्रशिक्षण शिबीराने होणार आहे. या प्रशिक्षणासाठी 250 हून अधिक लोकांनी नावनोंदणी केली आहे.  या शिबीराचे उद्दीष्ट लोकप्रतिनिधींची निवड आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्राथमिक माहिती देणे  आणि लोकांच्या मनातील शंका दूर करणे हे आहे. या प्रशिक्षण शिबीरानंतर जमिनीस्तरावरून काम सुरू होईल. तसेच या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणाऱ्यांना आपआपल्या भागात काम करण्यास सांगितले जाईल. तसेच त्यांच्या कामाची माहिती दर दोन महिन्यांनी घेतली जाईल.  आयएएसची नोकरी सोडून सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते बनलेले डॉ. अशोक चौधरी यांच्यामते "सुदृढ आणि खऱ्या लोकशाहीसाठी चांगली माणसे विधानसभेत पोहोचणे गरजेचे आहे. या शिबिरात कोणताही पक्ष आणि विचारसरणीशी निगडीत व्यक्ती सहभागी होऊ शकतील. राजस्थानमध्ये पुढच्या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत आणि आपण सुरू केलेल्या या प्रयत्नांमुळे काही चांगली आणि नवी माणसे निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात येतील."  

टॅग्स :PoliticsराजकारणRajasthanराजस्थानIndiaभारत