शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना मुंबई दूरच

By admin | Updated: September 23, 2014 04:30 IST

युती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीयुती होईल की तुटेल या प्रश्नांच्या जंजाळात राज्यच नव्हे तर केंद्राचे राजकारणही अडकले असताना, केंद्रात असलेल्या महाराष्ट्रातील मंत्री या वातावरणापासून चार हात लांबच आहेत. सध्या मंत्रालयातच थांबा, १ आॅक्टोबरनंतरच जबाबदारी दिली जाईल, असे सांगण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. विशेष म्हणजे, जागा वाटपाच्याच नव्हे, तर युती टिकवण्यासाठी पक्ष ‘दंडबैठका’ काढत असताना, महत्त्वाच्या समित्यांवर असलेले नितीन गडकरी वगळता अन्य तीन मंत्र्यांना राज्यातील कोणत्याही विषयात सहभागीही करून घेण्यात आलेले नाही. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर केंद्रातील मंत्र्यांना राज्यात पाठविण्याची योजना केंद्र सरकारची होती. तशी चाचपणी करून मागील दोन महिने काही मंत्री राज्यात पाठविण्यातही आले होते. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या तोंडावर गडकरी वगळता, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे यांना अजून एकही जबाबदारी सोपविण्यात आलेली नसल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपाचा तिढा सुटत नसल्याने केंद्रीय मंत्री किती काळजीत असतील याचा धांडोळा घेतला तेव्हा दिसून आले, की पक्षाने त्यांना हस्तक्षेप करू नका, कोणतेही विधान करू नका, कोणतीही जबाबदारी घेऊ नका, कोणाचीच शिफारस करू नका या चतुसूत्रीवर कायम राहण्याची सूचना केली. त्यामुळे माहिती प्रसारणमंत्री जावडेकर अमेरिकेत एका परिषदेसाठी गेले आहेत. ते २५ला पहाटे भारतात परततील. सार्वजनिक अन्न वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे चार दिवसांपासून जालना, लातूर व भोकरदन भागात फिरत आहेत. भोकरदनमधून त्यांचे चिरंजीव संतोष यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे प्रयत्न केले, ते फळास येत असल्याने ते दोन दिवसांच्या भोकरदन दौऱ्यावर गेले. ऊर्जा व कोळसा राज्यमंत्री पीयूष गोयल हे मोदी यांच्या मर्जीतील मानले जातात. पक्षाचे कोषाध्यक्ष होते. ते मूळचे मुंबईचे असल्याने दोन दिवस मुंबईस जाऊन आले खरे, पण सध्या दिल्लीतच आहेत. आज दिवसभर त्यांनी कार्यालयातच घालविला. कोणत्याही प्रकारचे राजकीय भाष्य त्यांना करायचे नाही. ११, अशोक रोड या भाजपाच्या केद्रीय कार्यालयात राज्याच्या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे; आणि युती होत नसल्याने काळजीही व्यक्त होते. सध्या तरी येथे वादळापूर्वीची शांतता आहे.