शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

अमेठीत निकटवर्तीयाची हत्या; स्मृती इराणींनी पार्थिवाला दिला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 5:26 PM

माजी सरपंचाच्या हत्येनं अमेठीत मोठी खळबळ

अमेठी: नवनिर्वाचित खासदार स्मृती इराणींचे निकटवर्तीय सुरेंद्र प्रताप सिंह यांच्या हत्येमुळे अमेठीत खळबळ माजली आहे. सिंह यांच्या निधनाचं वृत्त येताच स्मृती इराणी लगेचच अमेठीला पोहोचल्या. त्यांनी सिंह यांच्या कुटुंबाची भेट घेत मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असं आश्वासन दिलं. त्यानंतर भावुक झालेल्या इराणींनी सिंह यांच्या पार्थिवाला खांदादेखील दिला. सुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेला उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. सुरेंद्र यांची हत्या राजकीय वादातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबानं केला. 'स्मृती इराणींच्या विजयाबद्दल आम्ही आनंद साजरा केला. अनेक काँग्रेस समर्थकांना ही बाब रुचली नाही. याच कारणातून वडिलांची हत्या करण्यात आली,' असा गंभीर आरोप अभय सिंह यांनी केला. वडिलांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आणि त्यांना कठोर शिक्षा करण्याचं आवाहन त्यांनी इराणींना केलं. शनिवारी रात्री 3 च्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी सुरेंद्र सिंह यांची घरात घुसून हत्या केली. त्यावेळी सुरेंद्र वऱ्हांड्यात झोपले होते. बरौलिया गावचे माजी सरपंच असलेल्या सुरेंद्र यांच्यावर गोळीबार करण्यात आला. माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यसभेचे खासदार असताना बरौलिया गाव दत्तक घेतलं होतं. सुरेंद्र सिंह यांनी यंदाच्या निवडणुकीत स्मृती इराणींच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. सुरेंद्र यांचा अनेक गावांमध्ये उत्तम जनसंपर्क होता. त्याच जोरावर इराणींनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत विजय मिळवला. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपाMurderखूनcongressकाँग्रेस