शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

नेमबाजाचा Air India च्या अधिकाऱ्यांकडून अपमान; केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर करता आला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 11:04 AM

Air India : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकरला मिळाला विमानात प्रवेश, करण्यात आली होती पैशांची मागणी

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकरला मिळाला विमानात प्रवेश करण्यात आली होती पैशांची मागणी, मनू भाकरची माहिती

भारताची ऑलिंम्पियन नेमबाज मनू भाकर हिला कथितरित्या एअर इंडियाच्याविमानात प्रवेशापासून रोखण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आपल्यासोबत आवश्यक ती वस्तू तिच्याजवळ असल्यानं तिला प्रवेश नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नेमबाजीसाठी आवश्यक असलेलं शस्त्र नेण्यासाठी तिच्याकडे परवानगी असतानाही तिच्याकडून १० हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तसंच ही रक्कम न दिल्यामुळे तिला विमानात प्रवेश नाकारण्यात आला. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्तक्षेपानंतर मनू भाकर हिला विमानात जाण्याची परवानगी देण्यात आली. मनू भाकर हिनं शुक्रवारी संध्याकाळी ट्विटरवर दिल्ली विमानतळावरील एक फोटो शेअर केला. "मला IGI विमानतळावर AI 437 या विमानात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाहीये आणि १०,२०० रूपयांची मागणीही केली जात आहे. माझ्याकडे सर्व आवश्यक ती कागदपत्रे आहेत आणि DGP परमिटही आहे. एअर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी मनोज गुप्ता आणि अन्य कर्मचारी माझा अपमान करत आहेत. कारण माझ्याकडे बंदूक आणि काडतुसे आहेत. किरेन रिजीजू, हरदीप सिंग पुरी सर मी तुमची प्रतीक्षा करत आहे," असं मनू भाकर हिनं आपल्या फोटोसह लिहिलं. "कमीतकमी प्रत्येक वेळी तरी खेळाडूंचा अपमान करून नका आणि कृपया पैसेही मागू नका," असंही तिनं म्हटलं. यावेळी तिनं कथितरित्या त्रास देत असलेल्या अधिकाऱ्याचाही फोटो शेअर केला. "मनोज गुप्ता आणि त्यांचे सुरक्षा प्रभारी माझ्यासोबत गुन्हेगार असल्यासारखं वागत आहेत. अशा लोकांना कसं वागायचं याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. विमान उड्डाण मंत्रालय याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा करते," असंही मनू भाकरनं म्हटलं. यानंतर किरेनं रिजीजू यांच्या मदतीनंतर तिला विमानात प्रवेश देण्यात आला. यावर तिनं किरेन रिजीजू यांचे आभार मानले. तसंच मनू भाकर तू देशाचा अभिमान आहेस, असंही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाdelhiदिल्लीMadhya Pradeshमध्य प्रदेशairplaneविमान