Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 19:33 IST2024-09-27T19:29:19+5:302024-09-27T19:33:15+5:30
Giriraj Singh : याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
बेगुसराय : बेगुसरायचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह यांचे खासदार प्रतिनिधी असलेले अमरेंद्र कुमार अमर यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप कॉल करून ही धमकी देण्यात आली.
पाकिस्तानमधून व्हॉट्सॲप कॉल करून गिरीराज सिंह आणि मला शिवीगाळ करण्यात आली. तसेच, गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देण्यात आली, असे अमरेंद्र कुमार अमर यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेगुसराय मुख्यालयाचे डीएसपी म्हणाले की, वकील आणि खासदार प्रतिनिधी अमरेंद्र कुमार अमर यांनी व्हॉट्सॲपवर शहर पोलिस स्टेशनला एक अर्ज दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, त्यांच्या फोनवर पाकिस्तानमधून व्हॉट्सॲप कॉल आला होता. या कॉलमध्ये बेगुसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि त्यांचे खासदार प्रतिनिधी अमरेंद्र कुमार अमर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान, अमरेंद्र कुमार अमरयांनी व्हॉट्सॲपवरील ॲप्लिकेशनद्वारे पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नंबर आणि लोकेशन ट्रेस करून त्यांना धमकी देणारी व्यक्ती कोण आहे आणि धमकी देण्यामागे हेतू काय आहे, हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.