शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:07 IST

गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे.

नवी दिल्ली - गुजरातहिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे. गुरुवारीदेखील (21 डिसेंबर) यावरुन भाजपामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. शुक्रवारी (22 डिसेंबर) दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्रीपदासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये शुक्रवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.  शुक्रवारी गांधीनगर येथील विजयी आमदारांची बैठक होणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री निवडण्यात येणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सरोज पांडे, भूपेंद्र यादव व व्ही. सतीश सहभागी होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता गांधीनगरमधील गुजरात भाजपा मुख्यालयात  विधिमंडळाची बैठक होणार आहे.

गुजरातमध्ये मुख्यंत्रीपदासाठी नव्या व्यक्तीच्या नावाची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासहीत अन्य लोकांसोबत बैठक केली. तर दुसरीकडे हिमाचलमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात शिमलामध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यादरम्यान, जयराम ठाकूर यांच्या समर्थकांनी नारेबाजी करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे समर्थक एकवटले होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी गुजरातचे नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असतो. तसंच 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातची निवडणूक भाजपा, मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उप-मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्त्वात लढेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, असं जाहीर केलं होतं. सूत्रांच्या मते, यावेळी भाजपाला मिळालेल्या विजयात कमी अंतर असल्या कारणाने पक्ष नेतृत्व मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर विचार करू शकतात.

भाजपाने यावेळी गुजरातमध्ये माझ्या चेहऱ्याबरोबर निवडणुक लढविली. पण मुख्यमंत्रिपदाबद्दलचा अंतिम निर्णय संसदीय बोर्डाकडूनच केला जाईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार ? या पत्रकारांच्या प्रश्नावर विजय रूपाणी यांनी उत्तर दिलं आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला 99 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या.

गुजरातचे मुख्य सचिव जे एन सिंह यांनी मंगळवारी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण केलं. या स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा येथे होऊ शकतो, म्हणून सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण करत असल्याचं, जे एन सिंह यांनी म्हंटलं. टीमकडून महात्मा मंदिर आणि साबरमती रिव्हरफ्रंटसारख्या ठिकाणांचीही पाहणी केली जाईल, असं ते म्हणाले. 

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीच्या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Himachal Pradesh Assembly Election Results 2017हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2017Himachal Pradeshहिमाचल प्रदेशGujaratगुजरातBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी