शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

यूएलएफने स्वीकारली काश्मिरातील ११ लोकांच्या हत्येची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:41 IST

परप्रांतीय मजुरांना बाहेर जाण्याचा इशारा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत ११ नागरिकांच्या करण्यात आलेल्या हत्यांची जबाबदारी युनायटेड लिबरेशन फ्रंट (युएलएफ) या दहशतवादी गटाने घेतली आहे. काश्मीरमधील परप्रांतीय मजुरांनी खोरे सोडून जावे असा इशारा युएलएफने दिला आहे. देशात मुस्लिमांच्या अनेक ठिकाणी हत्या होत असून त्याचा आम्ही बदला घेणार आहोत असे लष्कर-ए-तय्यबाशी संलग्न असलेल्या युएलएफने म्हटले आहे. काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांमुळे तेथील परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरूवात झाली आहे.काश्मीरमध्ये रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली, त्याआधीही असा प्रकार घडला होता. हत्या झालेले नागरिक बिहार व उत्तर प्रदेशमधील मूळ रहिवासी होते. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये झालेल्या ११ नागरिकांच्या हत्यांची जबाबदारी स्वीकारणारे एक निवेदन युएलएफने जारी केले आहे. या गटाच्या दहशतवाद्यांनी परप्रांतीय मजुरांच्या निवासस्थानांमध्ये घुसून रविवारी गोळीबार केला होता. त्यात दोन जण ठार झाले. त्याआधी शनिवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात बिहार व उत्तर प्रदेशमधील दोन मजुरांना जीव गमवावा लागला. या मजुरांना सुरक्षा दलांच्या छावण्यांसह अन्य सुरक्षित ठिकाणी तातडीने हलविण्याची प्रक्रिया रविवार रात्रीपासून सुरू झाली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे हे मजूर भयभीत झाले आहेत.लष्करप्रमुख नरवणे काश्मीर दौऱ्यावरजम्मू-काश्मीरमध्ये परप्रांतीयांच्या हत्या होत असून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे हे सोमवारपासून त्या भागाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. ते सीमेवरील विविध ठिकाणांना भेट देऊन अधिकारी व जवानांशी चर्चा करतील.