उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:22 IST2025-08-07T13:19:39+5:302025-08-07T13:22:34+5:30
Uddhav Thackeray Delhi Visit: उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हेही शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर होते.

उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
Uddhav Thackeray Delhi Visit: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूनक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत आल्याने देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेते दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसणार आहेत. यात उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीत गेले असून, शरद पवार यांच्या घरीही भेट दिली.
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ठाकरेंचा हा दौरा तीन दिवसांचा आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे हे सर्वजण इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी सहकुटुंब हजेरी लावली.
रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित
दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, आमदार आदित्य उद्धव ठाकरे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली. ह्याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, खासदार फौझिया खान, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय दिना पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर व सलील देशमुख हे सहकरीदेखील आवर्जून उपस्थित होते, अशी माहिती खुद्द शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ५० टक्के टॅरिफपासून ते उपराष्ट्रपतींना द्याव्या लागलेल्या राजीनाम्यासह अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकार, भाजपा महायुतीवर जोरदार निशाणा साधला. तसेच मनसे युतीबाबतही भाष्य केले.
आज माझ्या दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, आमदार श्री. आदित्य उद्धव ठाकरे ह्यांनी सदिच्छा भेट घेतली.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 6, 2025
ह्याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत, खासदार फौझिया खान, खासदार अमोल… pic.twitter.com/phYrhlHlGz