उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 03:44 PM2019-09-13T15:44:15+5:302019-09-13T15:45:55+5:30

आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली.

Udayan Raje bhosale in Delhi to join BJP, Special Chopper ride with Chief Minister devendra fadanvis | उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी 

उदयनराजे दिल्ली दरबारी, मुख्यमंत्र्यांसोबत स्पेशल चॉपरची सवारी 

Next

मुबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन उदयनराजेंनी संदेश लिहून उद्या म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी विशेष हेलिकॉप्टरने उदयनराजेंना घेऊन दिल्लीला जाणार आहेत. 

आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठिशी राहिल, हीच अपेक्षा, असे म्हणत उदयनराजेंनी भाजपा प्रवेशाची घोषणा केली. आता, लढाई रयतेच्या विकासासाठी फक्त अशा आशयाचे बॅनर लावून गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयंमत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश होणार असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले. 

खासदार उदयनराजे यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत चर्चा झाल्यानंतर राजेंनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे. पवार यांच्यासोबतच्या भेटीवेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचे वृत्त नाकारले होते. उदयनराजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला आले होते, असे मुंडेंनी सांगितले होते. मात्र, मुंडेंचा आशावाद फोल ठरला असून उदयनराजे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. 
 
 

Web Title: Udayan Raje bhosale in Delhi to join BJP, Special Chopper ride with Chief Minister devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.