उत्तराखंडमध्ये UCC लागू; हलाला, इद्दत, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी! CM धामी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:17 IST2025-01-27T15:17:26+5:302025-01-27T15:17:53+5:30

आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे." एवढेच नाही तर, "या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हलाला, इद्दत, बहुपत्नीत्व आणि तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंद होईल...

UCC implemented in Uttarakhand; Halala, Iddat, polygamy, triple talaq completely banned! CM Dhami spoke clearly | उत्तराखंडमध्ये UCC लागू; हलाला, इद्दत, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी! CM धामी स्पष्टच बोलले

उत्तराखंडमध्ये UCC लागू; हलाला, इद्दत, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी! CM धामी स्पष्टच बोलले

उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानंतर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, "हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या कायद्यासाठी रात्रंदिवस अगदी समन्वयाने काम केले. मुख्य सेवक सदन येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री धामी म्हणाले, आजचा दिवस केवळ आपल्या राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या यूसीसीची अंमलबजावणी कर आहोत.

धामी पुढे म्हणाले, उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू करून, आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान सभेतील सर्व सदस्यांना भावांजली अर्पण करतो. यूसीसीच्या अंमलबजावणीमुळे उत्तराखंडमधील सर्व नागरिकांचे हक्क आता समान झाले आहेत. सर्व धर्माच्या महिलांसाठी एकच संपूर्ण कायदा असेल. आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे." एवढेच नाही तर, "या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे हलाला, इद्दत, बहुपत्नीत्व आणि तिहेरी तलाकवर पूर्णपणे बंद होईल.

कुठल्याही धर्म-पंथाच्या विरोधात नाही -
मुख्यमंत्री म्हणाले, समान नागरिक संहिता कुठल्याही धर्म अथवा पंथाच्या विरोधात नाही. यात कुणालाही टार्गेट करण्यचे काहीही कारण नाही. या समाजात समानता आणण्याचा कायदेशीर प्रयत्न आहे. यात कुठलीही प्रथा बदलण्यात आलेली नाही, उलटपक्षी  कुप्रथा संपवण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जमाती वगळता उत्तराखंडच्या सर्व नागरिकांसाठी असेल UCC -
महत्वाचे म्हणजे, अनुसूचित जमाती वगळता संपूर्ण उत्तराखंड राज्यात तसेच राज्याबाहेर राहणाऱ्या उत्तराखंडमधील रहिवाशांनाही UCC लागू असेल. यूसीसी लागू करण्यासाठी, ग्रामीण भागात एसडीएम हे रजिस्ट्रार असतील आणि ग्रामपंचायत विकास अधिकारी हे सब-रजिस्ट्रार असतील. तर नगर पंचायत - नगरपालिकांमध्ये संबंधित एसडीएम हे रजिस्ट्रार असतील तर कार्यकारी अधिकारी हे सब-रजिस्ट्रार असतील. याच पद्धथीने, महानगरपालिका क्षेत्रात, महानगरपालिका आयुक्त हे रजिस्ट्रार असतील आणि कर निरीक्षक हे सब-रजिस्ट्रार असतील. छावनी भागांत संबंधित सीईओ हे रजिस्ट्रार असतील तर निवासी वैद्यकीय अधिकारी अथवा सीईओने अधिकृत केलेला अधिकारी सब-रजिस्ट्रार असेल. या सर्वांच्या वर असतील रजिस्ट्रार जनरल, जे सचिव दर्जाचे अधिकारी तथा इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन असतील.

Web Title: UCC implemented in Uttarakhand; Halala, Iddat, polygamy, triple talaq completely banned! CM Dhami spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.