दोन बायका, लव्हस्टोरी ऐका, आणखी एका यूट्युबरचा दोन पत्नींसोबत व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 14:30 IST2023-04-07T14:30:14+5:302023-04-07T14:30:44+5:30

Social Viral: दोन पत्नी असलेला यूट्युबर अरमान मलिकनंतर काही काळापूर्वी बराच चर्चेत आला होता. आता आणखी एक यूट्युबर त्याच्या दोन पत्नींमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Two wives, listen to the love story, another YouTuber's video with two wives goes viral | दोन बायका, लव्हस्टोरी ऐका, आणखी एका यूट्युबरचा दोन पत्नींसोबत व्हिडीओ व्हायरल 

दोन बायका, लव्हस्टोरी ऐका, आणखी एका यूट्युबरचा दोन पत्नींसोबत व्हिडीओ व्हायरल 

दोन पत्नी असलेला यूट्युबर अरमान मलिकनंतर काही काळापूर्वी बराच चर्चेत आला होता. आता आणखी एक यूट्युबर त्याच्या दोन पत्नींमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या यूट्युबरचं नाव सनी आहे. तर रूप राजपूत आणि मानसी राजपूत या त्याच्या दोन पत्नी आहेत. त्याला हल्लीच इन्स्टाग्रावर दोन पत्नींसह व्हिडीओ शेअर केल्याने ट्रोल करण्यात आलं होतं.

सनी राजपूत सनी फॅमिली नावाचा यूट्युब चॅनल चालवतो. त्याचे २२७,००० सब्स्क्रायबर्स आहेत. तो आपल्या प्रोफाइलवर स्वत:ला डिजिटल कंटेंट मेकर आणि फॅमिली एंटरटेनर म्हणवून घेतात. इन्स्टाग्रामवर त्याचे २ लाख १६ हजार फॉलोअर्स आहेत. तसेत त्याच्या दोन्ही पत्नींचेही हजारो फॉलोअर्स आहेत. त्याशिवाय सन्नी राजपूतच्या आणखी एका यूट्युब चॅनलवर ५ हजार सब्स्क्रायबर्स आहेत. त्यावर तो दैनंदिन दिनचर्येसोबत खासगी जीवनातील व्हिडीओ शेअर करत असतो.

दरम्यान, अरमान मलिक हा यूट्युबर त्याच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गर्भवती असल्याने चर्चेत आला होता. त्याचेही डेली लाईफचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळत असतात.  

Web Title: Two wives, listen to the love story, another YouTuber's video with two wives goes viral