Two people have died in a terrorist attack in Srinagar | श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन नागरिक मृत्युमुखी  
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन नागरिक मृत्युमुखी  

श्रीनगर - श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृत नागरिकांपैकी एक नॅशनल कॉन्फ्रन्सचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीनगरमधील कारफाल्ली मोहल्ला येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असून, दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात तीन नागरिक गंभीर जखमी झाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. 

राजकीय पार्श्वभूमी असलेल्या दोन नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली असून, या संदर्भातील अधिक माहिती आम्ही घेत आहोत, अशी माहिती श्रीनगरचे एसएसपी  इम्तियाझ इस्माइल पॅरे यांनी दिली आहे.  

Web Title: Two people have died in a terrorist attack in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.