शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

By admin | Updated: November 29, 2015 23:55 IST

रामेश्वर कॉलनीतील घटना : चार जण जखमी; एकावर चाकु हल्ला

रामेश्वर कॉलनीतील घटना : चार जण जखमी; एकावर चाकु हल्ला
जळगाव : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरुन रामेश्वर कॉलनीत रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता दोन गटात हाणामारी झाली. यात दगड व चाकूचा वापर करण्यात आला. उमेश संजय गजरे (वय १९), मयुर सुनील वाणी (वय १८) गोपाळ देविदास मगर (वय ३५) सर्व रा.रामेश्वर कॉलनी व संजय सुरेश मराठे (वय २० रा.वाघ नगर) हे चार जण जखमी झाले आहेत.
रामेश्वर कॉलनी व रुग्णालयात तणाव
दोन गटातील तरुणांमध्ये वाद होवून दगडफेक व चाकू हल्ला झाल्याने रामेश्वर कॉलनीत तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गटातील सुमारे शंभर जणांचा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे व सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी अतिरिक्त कुमक घेवून घटनास्थळ गाठले. तोपर्यंत जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पोलिसांनी वादावर नियंत्रण मिळविल्यानंतर हा जमाव पटेल दवाखान्याजवळ जमला. येथेही पोलिसांनी गर्दी पांगविली नंतर वादग्रस्त प्रकरण असल्याने डॉक्टरांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविले.
या जखमींना जिल्हा रुग्णालयात आणल्याचे समजताच शंभराच्यावर तरुणांनी तिकडे धाव घेतली. दोन्हीकडील तरुण एकमेकाच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे तणाव अधिक वाढला होता. निरीक्षक कुराडे, धारबळे हे देखील ताफ्यासह तातडीने रुग्णालयात पोहचले. त्यापाठोपाठ नगरसेवक सुमित्रा सोनवणे यांचा मुलगा भूषण सोनवणे व अशोक लाडवंजारी दाखल झाले. तोपर्यंत वाद घालणारे तेथून पसार झाले होते.
मयुरला खासगी हलविले
मयुर याच्या पोटावर चाकुने वार झाल्याने भूषण सोनवणे व सहकार्‍यांनी त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविले. दोन्ही गटाचे चार तरुण जखमी असले तरी या हल्लयात आणखी कोणाचा समावेश होता.कोणी कोणावर हल्ला केला याबाबत जखमीही सांगायला तयार नसल्याने गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांचीही गोची झाली होती. त्यामुळे जखमींच्या जबाबानुसार दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.