धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 11:02 IST2025-11-27T11:00:51+5:302025-11-27T11:02:02+5:30
मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
मध्य प्रदेशातील दोन महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्या दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्याच सहकाऱ्यांनी प्रेमसंबंधाबद्दल टोमणे मारले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने आणि तरुणाने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. महिलेच्या घरातून एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. नोटमध्ये नाव असलेल्यांविरुद्ध विभागीय पातळीवर चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय रजनी दुंडेले या बैतुल जिल्ह्यात लिपिक होत्या. २९ वर्षीय मिथुन हा पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होता. दोघांनीही आत्महत्या केली. बुधवारी त्यांचे मृतदेह बाईवाडी गावातून सापडले. ते मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता होते, त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला आणि नंतर त्यांचे मृतदेह सापडले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
नेमके कारण काय?
रजनी आणि मिथुन हे त्यांच्या विभागातील सहकाऱ्यांकडून होणाऱ्या प्रेमसंबंधांबद्दलच्या टोमण्यांना कंटाळले होते. रजनीच्या घरी एक सुसाईड नोट सापडली, यामध्ये हे नमूद केले आहे. महिलेने लिहिले आहे की ती मिथुनला आपल्या मुलासारखे मानते आणि सहकाऱ्यांकडून त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल होणाऱ्या टोमण्यांमुळे ती अस्वस्थ होती.
'चारित्र्याबद्दल वारंवार होणारे टोमणे सहन होत नव्हते, असे त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे. त्यांनी सुसाईड नोटमध्ये ४-५ लोकांची नावेही घेतली आहेत. महिलेने या लोकांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत होते. सहकाऱ्यांच्या कमेंट्समुळे ते नाराज होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रजनी यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे लग्न होणार होते. त्याची तयारीही सुरू होती. पण, अचानक आत्महत्या केली.