शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस अगोदरच मिरवणुकीसाठी नंबर विसर्जनाची तयारी : पालिकाही लागली कामाला

By admin | Updated: September 14, 2016 00:41 IST

नाशिक : गुरुवारी (दि. १५) होणार्‍या गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी शासकीय यंत्रणा आणि गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा दोन दिवस अगोदरच मंडळांनी नंबर लावले आहेत. महापालिका आणि पोलीस यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी कामाला लागली असून मिरवणूक शांततेत आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळांना अनेक अटी शर्तींना सामोरे जावे लागत आहे.

नाशिक : गुरुवारी (दि. १५) होणार्‍या गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी शासकीय यंत्रणा आणि गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदा दोन दिवस अगोदरच मंडळांनी नंबर लावले आहेत. महापालिका आणि पोलीस यंत्रणाही विसर्जन मिरवणुकीसाठी कामाला लागली असून मिरवणूक शांततेत आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मंडळांना अनेक अटी शर्तींना सामोरे जावे लागत आहे.गेल्या ५ सप्टेंबर रोजी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली असून गेले दहा दिवस गणरायाचा जागर करण्यात येत आहे. विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आता गुरुवारी (दि. १५) अनंत चतुर्दशी असून गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू केली आहे. मंडळांनी मिरवणुकीतील ढोल-ताशांचे पथक आणि साहसी खेळ, लेजीम पथके तयार केली आहेत. अनेक मंडळांची विद्युत रोषणाई असून त्यांनी रथ सजविण्यास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे यंदा अनेक मंडळांनी वाकडी बारव या ठिकाणी नंबर लावले आहेत. याठिकाणी मिरवणुकीपूर्वी नेहमीच नंबर लावले जात असले तरी यंदा दोन दिवस अगोदरच प्रमुख मंडळांनी आपल्या जागा निश्चित केल्या आहेत. महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर खड्ड्यांच्या डागडुजीसह अन्य सुविधा देण्याची तयारी केली आहे. मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करण्यात आले आहेत. रामकुंडाबरोबरच शहराच्या विविध भागात महापालिकेने विसर्जन स्थळे निश्चित केली असून तेथे मंडप टाकून विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. जीवरक्षक आणि सुरक्षाप्रहरी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय शहराच्या विविध भागात कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेने मिरवणूक शांततेत आणि वेळेत पार पाडण्यासाठी तयारी केली असून शहराच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तसेच दोन मंडळांमध्ये अधिक अंतर असता कामा नये, असे मंडळांना सूचित करण्यात आले आहे...इन्फो...महापौरांना पाहणी दौर्‍याचे विस्मरणदरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दोन ते तीन दिवस अगोदरच महापौर, उपमहापौर तसेच पालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वीज मंडळाचे अधिकारी वाकडी बारवपासून रामकुंडापर्यंत मार्गाची पाहणी करतात आणि त्यातील संभाव्य अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊन कार्यवाही करतात. यंदा मात्र महापौरांसह संबंधितांना विस्मरण झाले आहे.